दलित पँथर चा झंजावात घुमणार आता साताऱ्यात दलित पॅंथर संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी आशिष मोरे यांची नियुक्ती डॉ स्वप्नील ढसाळ यांची मुंबईमध्ये घोषणा



,

प्रतिनिधी सातारा 

दलित पँथर चा झंजावात घुमणार आता साताऱ्यात दलित पॅंथर संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी आशिष मोरे यांची नियुक्ती डॉ स्वप्नील ढसाळ यांची मुंबईमध्ये घोषणा..

बहुजनांच्या अन्यायाला वाचा फोडणारे व आपल्या लेखणीतून व झुंजार झंजावाताने महाराष्ट्राला हादरवत अन्यायाला प्रतिप्रश्न करणारे दलित पॅंथर संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ स्वप्निल ढसाळ यांनी मुंबई येथील कार्यालयात आशिष मोरे यांना सातारा जिल्ह्याची जबाबदारी देत जिल्हाध्यक्ष पदाची धुरा त्यांच्या खांद्यावरती सोपवली आहे, या नियुक्तीने नव्या कार्यकर्त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ आले असून आशिष मोरे म्हणाले मी चळवळीतील जुना कार्यकर्ता आहे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व आदरणीय पद्मश्री नामदेव ढसाळ साहेबांचे ध्येयधोरण हे आमच्या डोळ्यासमोर आहेत हक्क मागून भेटत नाहीत तर ते ओढून घ्यावे लागतात हे आम्हाला माहित आहे, आणि म्हणूनच एकतर्फी धोरणाला विरोध करत अन्यायाला वाचा फोडत आता नव्या काळाची व नव्या ध्येयधोरणाची गरज इथल्या वंचित पिढीत शोषिताला येऊन पडली आहे, आणि मला पूर्ण विश्वास आहे संघटना व संघटनेचा कार्यकर्ता हा घराघरात जन्म घेईल अन्यायाला वाचा फोडेल आणि नामदेव ढसाळ साहेबांचे विचार व डॉक्टर स्वप्नील ढसाळ साहेबांचे ध्येयधोरण हे आम्ही समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे पूर्ण ताकतीने काम करू व येणाऱ्या काळात सातारा जिल्ह्यात पॅंथरचा झंझावात दाखवून देऊ असे आशिष मोरे यांनी सांगितले ..