नारीशक्ती’चा गौरव करूया आणि महिलांच्या हक्कांसाठी खंबीरपणे उभे राहूया, पाचगणी नगरीच्या मा: नगराध्यक्ष व नगरसेवक लक्ष्मी कराडकर यांचे प्रतिपादन
March 8, 2026 | महाबळेश्वर
प्रतिनिधी
अनमोल कांबळे
आज 8 मार्च जागतिक महिला दिन या दिनानिमित्त पाचगणी नगरीच्या लोकप्रिय मा: नगराध्यक्ष नगरसेवक लक्ष्मी कराडकर महिला दिनानिमित्त शुभेच्छा देताना म्हणाल्या स्त्री ही केवळ कुटुंबाचा आधार नाही, तर ती समाजाची शक्ती आहे आजची स्त्री शिक्षणापासून ते अंतराळापर्यंत, राजकारणापासून ते उद्योगापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपले नाव कमवत आहे आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा अनेक नात्यांमधून ती प्रेम आणि त्याग शिकवते. सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, जिजाऊ, माता भिमाई माता रमाई पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कल्पना चावला यांसारख्या अनेक स्त्रियांनी इतिहासात आपलं स्थान निर्माण केलं आहे पण, आजही आपल्याला सामाजिक दुष्ट प्रवृत्ती, लैंगिक असमानता आणि भेदभावाचा सामना करावा लागतो महिला दिन साजरा करणे म्हणजे केवळ शुभेच्छा देणे नाही, तर स्त्रीला मानवी हक्क आणि समान संधी देणे होय. जोपर्यंत प्रत्येक मुलीला महिलेला सुरक्षित आणि सन्मानाने जगता येणार नाही, तोपर्यंत आपला विकास अपूर्ण आहे मी माझ्या 15 वर्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात आणि 25 वर्षाच्या राजकीय सामाजिक कार्यकाळात मी पाचगणी शहर आणि परिसरात अनेक महिलांकरिता भरपूर उपक्रम राबविले अनेक महिलांनी त्यांचे लाभ घेतले माझ्या स्वतःची भाषाशैली भाषेवरचं प्रभुत्व अभ्यासू प्रशासनातील वैचारिक पातळी याचा सुद्धा आदर्श अनेक महिला सहकारी कर्मचारी महिला यांनी घेतला अनुकरण केले त्यांच्या मध्ये सुद्धा परिवर्तन झाले त्या सक्षम झाल्या महिला सक्षमीकरण अधिक प्रभावी व्हावे प्रत्येक महिला स्वावलंबी व्हावी याकरिता म्हणूनच, 8 मार्च महिला दिनाच्या या दिवशी आपण ‘नारीशक्ती’चा गौरव करूया आणि महिलांच्या हक्कांसाठी खंबीरपणे उभे राहूया. स्त्री सक्षमीकरण हाच प्रगतीचा खरा मार्ग आहे! “स्त्री शक्तीचा करा सन्मान तिच्यामुळेच आहे प्रगतीचे मोजमाप,तीच आहे या जगाचा आधार,तिच्या कर्तृत्वाला माझा नमस्कार!” असे पाचगणी नगरीच्या मा:नगराध्यक्ष नगरसेवक लक्ष्मी कराडकर म्हणाल्या.
Categories: महाबळेश्वर
Related Posts
दलित पँथर चा झंजावात घुमणार आता साताऱ्यात दलित पॅंथर संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी आशिष मोरे यांची नियुक्ती डॉ स्वप्नील ढसाळ यांची मुंबईमध्ये घोषणा
February 27, 2026
प्रतिनिधी सातारा दलित पँथर चा झंजावात घुमणार आता साताऱ्यात दलित पॅंथर संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी आशिष मोरे यांची नियुक्ती डॉ स्वप्नील ढसाळ…
पाचगणी येथील सिद्धार्थ नगर मध्ये जमिनीवर जबरदस्ती ताबा व खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी नगरसेवक सह गोडवली येथील एका माजी सरपंचावरती कारवाई कधी? डॉक्टर दिघेंचा सवाल.!
March 8, 2026
प्रतिनिधी पांचगणी पाचगणी येथील सिद्धार्थ नगर मध्ये जमिनीवर जबरदस्ती ताबा व खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी नगरसेवक सह गोडवली…
