मौजे दानवली गावातील अर्जुन गेनू दानवले याच्यावरती आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल.!

मौजे दानवली गावातील अर्जुन गेनू दानवले याच्यावरती आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल.!

February 10, 2026 | महाबळेश्वर

प्रतिनिधी पांचगणी 

मौजे दानवली गावातील अर्जुन गेनू दानवले याच्यावरती आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल.

दिनांक 7/2/2026 रोजी पंचायत समिती निवडणुकी दरम्यान मतदाना दिवशी दानवली गावामध्ये निवडणूक कक्षाच्या बाहेर 100 मीटर अंतराच्या आत मध्ये निवडणूक कक्षाच्या बाहेर MH 11 DA 7145 या महिंद्रा कंपनीच्या बुलेरो कार मध्ये बसून अर्जुन गेनू दानवले राहणार दान वली याने पंचायत समिती भिलार गण 70 मधील निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणाऱ्या घड्याळ चिन्हा चे डेमो मशीन आपल्या गाडीमध्ये ठेवून लोक निवडणूक प्रक्रियेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जात असताना घड्याळाच्या चिन्हा समोरील बटन दाबा असे डेमो मशीन गाडीत ठेवलेले हातामध्ये घेऊन अर्जुन गेनू दानवले राहणार दानवली हा मतदारांना सांगत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता त्यानंतर हा प्रकार समजतात प्रतिस्पर्धी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ पूनम निलेश गोळे यांनी मतदान केंद्रावरती धाव घेतली व आचारसंहितेचा संबंधित व्यक्ती भंग करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून संबंधित व्यक्ती वरती आक्षेप घेत गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती त्यानंतर भरारी पथक जागेवरती पोहोचण्यास विलंब करत असल्याने ही बाब थेट तहसीलदार महाबळेश्वर व पोलीस अधीक्षक सातारा यांच्या निदर्शनास फोन द्वारे आणून दिल्यानंतर संबंधित ठिकाणी भरारी पथक दाखल झाले त्यानंतर भरारी पथकाने अर्जुन गेनू दानवले याचे गाडीतील डेमो मशीन भरारी पथकाने जप्त करत त्याच्यावरती त्याच दिवशी ही गंभीर बाब म्हणून गुन्हा दाखल केला परंतु गुन्हा दाखल करत असताना या गुन्ह्यांमध्ये वापरलेली गाडी अद्याप भरारी पथकाने जप्त केली नसल्याचे सांगत या गोष्टीचा आपण स्वतः न्यायालयात धाव घेऊन योग्य रीतीने तपास करून अर्जुन गेनू दानवले याला कठोर शासन होण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ पुनम निलेश गोळे यांनी सांगितले.

Categories: महाबळेश्वर

Related Posts

दलित पँथर चा झंजावात घुमणार आता साताऱ्यात दलित पॅंथर संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी आशिष मोरे यांची नियुक्ती डॉ स्वप्नील ढसाळ यांची मुंबईमध्ये घोषणा

February 27, 2026

प्रतिनिधी सातारा  दलित पँथर चा झंजावात घुमणार आता साताऱ्यात दलित पॅंथर संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी आशिष मोरे यांची नियुक्ती डॉ स्वप्नील ढसाळ…