पाचगणी शहरात जयदीप बारूट कडून उत्खननाचा महापूर शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी ही डुबवली जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीचा ही भंग केला बारुट वरती कारवाई करू नका याकरिता मुख्याधिकाऱ्यांवरती दबाव आणणारा प्रभाग क्रमांक ९ मधील तो नगरसेवक कोण? जयदीप बारुट ला प्रशासनाकडून आश्रय नक्की कशासाठी.?
May 14, 2026 | सातारा
प्रतिनिधी सातारा
पाचगणी शहरात जयदीप बारूट कडून उत्खननाचा महापूर शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी ही डुबवली जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीचा ही भंग केला बारुट वरती कारवाई करू नका याकरिता मुख्याधिकाऱ्यांवरती दबाव आणणारा प्रभाग क्रमांक ९ मधील तो नगरसेवक कोण? जयदीप बारुट ला प्रशासनाकडून आश्रय नक्की कशासाठी?
पाचगणी नगरपालिका हद्दीमध्ये जयदीप बारूट नावाच्या इसमा कडून प्रचंड मोठ्या प्रमाणात लाखो ब्रास उत्खननासह वृक्षतोड करण्यात आली आहे इतकच नाहीतर जिल्हाधिकारी व नगरसेवक यांनी जयदीप बारूट यांना बांधकाम करण्याकरिता दिलेल्या परवानगीचा ही भंग झाला असून मुख्याधिकारी पंडित पाटील यांना या बांधकामावरती कारवाई न करण्याकरिता प्रभाग क्रमांक ९ मधील एक नगरसेवक दबाव आणत असल्याचेही चित्र समोर आले आहे, हजारो ब्रास उत्खनन करून देखील वृक्षतोड करून देखील गाव कामगार तलाठी मंडळ अधिकारी यांनी या उत्खननाकडे पाठ केली असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीचा ही भंग होत असताना मुख्याधिकारी पंडित पाटील देखील इकडे फिरकत नसल्याने मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्यावरती प्रभाग क्रमांक ९ मधील एका नगरसेवकाचा दबाव आहे का? की मुख्याधिकारी दबावापोटी गप्प बसले आहेत का? अशी चर्चा शहरभर पसरली आहे नवनिर्वाचित नगरसेवक निवडून गेल्यापासून मुख्याधिकारी पंडित पाटील यांच्या कार्यकाळामध्ये दोन आंदोलने पाचगणी नगर परिषदेच्या समोर झाली आहेत याचाच अर्थ प्रशासनावरती योग्यरित्या काम न करण्याकरिता दबाव आहे का? मुख्याधिकारी पंडित पाटील हे दबावा पोटी गप्प बसले आहेत का? अशी चर्चा शहरभर पसरली आहे, जयदीप बारुट याने जिल्हाधिकाऱ्यांनी व नगर रचना विभागाने दिलेल्या परवानगीचा भंग केल्यानंतर आता मुख्याधिकारी पंडित पाटील दिलेली परवानगी रद्द करण्याकरिता जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव पाठवणार का? की पुन्हा एकदा दबावा पोटी गप्प बसणार हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे, तर दुसरीकडे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे म्हणाले जयदीप बारुट त्याने प्रशासनाने दिलेल्या परवानगीचा दूर उपयोग केलेला आहे आणि म्हणून तात्काळ बारुट याला शासनाने दिलेली परवानगी रद्द करण्याकरिता मुख्य अधिकारी यांनी तात्काळ प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवावा बारुट यांनी हजारो ब्रास केलेल्या उत्खननाचा पंचनामा करावा अथवा येत्या सोमवारपासून जिल्हा अधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर करून मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन जोपर्यंत बारुट यांना दिलेली परवानगी रद्द होत नाही परवानगी रद्द करण्याकरिता मुख्य अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवत नाहीत तोपर्यंत पाचगणी नगरपालिकेच्या दारासमोर बेमुदत धरणे व अन्य त्या उपोषण करणार असल्याचे पीपल रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांनी सांगितले आहे.
Categories: सातारा
Related Posts
पाचगणी नगर परिषदेमध्ये संविधान चौकाच्या नामांतराचा एक मुखाने ठराव मंजूर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची ही ठरावाला मंजुरी.!
May 10, 2026
प्रतिनिधी पांचगणी पाचगणी नगर परिषदेमध्ये संविधान चौकाच्या नामांतराचा एक मुखाने ठराव मंजूर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची ही ठरावाला मंजुरी.! पाचगणी नगर परिषदेकडे…
पाचगणी व पाचगणी परिसराच्या वतीने भीम आधारस्तंभ संस्थेच्या माध्यमातून संभाजी महाराज जयंती निमित्त पाचगणी शहरात छत्रपतींना अभिवादन.!
May 14, 2026
प्रतिनिधी पांचगणी पाचगणी व पाचगणी परिसराच्या वतीने भीम आधारस्तंभ संस्थेच्या माध्यमातून संभाजी महाराज जयंती निमित्त पाचगणी शहरात छत्रपतींना अभिवादन.! पाचगणी…
