पाचगणी नगर परिषदेमध्ये संविधान चौकाच्या नामांतराचा एक मुखाने ठराव मंजूर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची ही ठरावाला मंजुरी.!
May 10, 2026 | महाबळेश्वर
प्रतिनिधी पांचगणी
पाचगणी नगर परिषदेमध्ये संविधान चौकाच्या नामांतराचा एक मुखाने ठराव मंजूर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची ही ठरावाला मंजुरी.!
पाचगणी नगर परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्याकडील चौकाला संविधान चौक हे नाव द्या अशी मागणी अनेक वर्षांपासून पाचगणी व पाचगणी परिसरातील नागरिकांची होती व त्या मागणीला पाचगणी नगर परिषदेचे नगराध्यक्ष दिलीप बगाडे तसेच आघाडीचे अध्यक्ष नगरसेवक शेखर कासुर्डे व विरोधी पक्ष नेते नगरसेवक वैभव कराडकर यांच्यासह सर्व नगरसेवकांनी एक मुखाने या नामांतराच्या ठरावाला सहमती दिल्याने पाचगणी परिसरामध्ये संविधान चौकाची मागणी करणाऱ्या भीम आधारस्तंभ या संस्थेच्या मागणीला यश आले असल्याचे दिसून आले असून या अनुषंगाने संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे गुरुजी संतोष कांबळे नितीन वन्ने अनमोल कांबळे विकी परिहार संजय वन्ने किसन गंगावणे नितीन कांबळे निलेश मोरे उत्तम कांबळे वसंत कदम दिलीप सपकाळ व इतर सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी दिलेल्या निवेदनाचं गांभीर्य लक्षात घेऊन ठराव पास करणाऱ्या नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे गुरुजी यांनी आभार व्यक्त केले त्यानंतर आघाडीचे अध्यक्ष शेखर कासुर्डे म्हणाले आमची ही घाडी सर्वसामान्यांच्या भावना जोपासणारी आघाडी आहे अनेक वर्षापासून या संविधान चौकाच्या नामांतराचा मुद्दा प्रलंबित होता परंतु तो नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्व सदस्यांनी मंजूर करून भीम आधारस्तंभ या संस्थेच्या मागणीला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, व इथून पुढे देखील जेव्हा जेव्हा सर्वसामान्यांच्या हितकारक गोष्टींचा मुद्दा या आघाडीच्या समोर येईल तेव्हा तेव्हा लोकांच्या हितकारक असणाऱ्या गोष्टी संदर्भातील निर्णय एकमुखाने घेतले जातील, तर दुसरीकडे विरोधी पक्षांमध्ये असणारे नगरसेवक वैभव कराडकर म्हणाले संविधान चौकाचा मुद्दा अनेक वर्षापासून प्रलंबित होता व त्या संदर्भात भीम आधारस्तंभ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे पत्रव्यवहार केला व प्रशासनासह सर्व सन्माननीय सदस्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली ही अत्यंत कौतुकास्पद बाब असून या ठरावाला एक मुखाने आम्ही सर्व मान्यता देतो व ठारावाचे स्वागत करतो.
Categories: महाबळेश्वर
Related Posts
पाचगणी परिसरात चोरांचा धुमाकूळ रात्रीच्या अंधारात कामावरून परतणाऱ्या महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणी वरती पाचगणी पोलीस चोरांच्या मुसक्या कधी आवळणार? सर्वसामान्यांना पडलाय प्रश्न.!
May 6, 2026
प्रतिनिधी अनमोल कांबळे पाचगणी परिसरात चोरांचा धुमाकूळ रात्रीच्या अंधारात कामावरून परतणाऱ्या महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणी वरती पाचगणी पोलीस चोरांच्या मुसक्या…
पाचगणी शहरात जयदीप बारूट कडून उत्खननाचा महापूर शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी ही डुबवली जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीचा ही भंग केला बारुट वरती कारवाई करू नका याकरिता मुख्याधिकाऱ्यांवरती दबाव आणणारा प्रभाग क्रमांक ९ मधील तो नगरसेवक कोण? जयदीप बारुट ला प्रशासनाकडून आश्रय नक्की कशासाठी.?
May 14, 2026
प्रतिनिधी सातारा पाचगणी शहरात जयदीप बारूट कडून उत्खननाचा महापूर शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी ही डुबवली जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीचा ही भंग…
