पाचगणी व पाचगणी परिसराच्या वतीने भीम आधारस्तंभ  संस्थेच्या माध्यमातून संभाजी महाराज जयंती निमित्त पाचगणी शहरात छत्रपतींना अभिवादन.!

पाचगणी व पाचगणी परिसराच्या वतीने भीम आधारस्तंभ संस्थेच्या माध्यमातून संभाजी महाराज जयंती निमित्त पाचगणी शहरात छत्रपतींना अभिवादन.!

May 14, 2026 | महाबळेश्वर

प्रतिनिधी पांचगणी

पाचगणी व पाचगणी परिसराच्या वतीने भीम आधारस्तंभ संस्थेच्या माध्यमातून संभाजी महाराज जयंती निमित्त पाचगणी शहरात छत्रपतींना अभिवादन.!

पाचगणी व पाचगणी परिसराच्या वतीने भीम आधारस्तंभ संस्थेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पाचगणी शहरात छत्रपतींना अभिवादन करण्यात आले यावेळी पंचक्रोशीतील भीम आधारस्तंभ संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मोरे गुरुजी म्हणाले छत्रपतींचे कार्य हे जगाला दिशा देणारे कार्य आहे छत्रपतींचा विचार घराघरात पोहोचला गेला पाहिजे योद्धा कसा असावा हे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे बघून शिकलं पाहिजे सर्वांनी एक संघ राहून प्रत्येक गोष्टीवरती मात केली पाहिजे इतिहास हा विसरायचा नसतो तर त्याचे धडे घ्यायचे असतात तर दुसरीकडे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे म्हणाले अवघ्या नव वर्षाच्या कारकिर्दीमध्ये युवराज छत्रपतींनी मोघलान विरोधात अनेक लढाया जिंकल्या पराक्रम गाजवला आणि संस्कृत हिंदी सह अनेक भाषांवरती प्रभुत्व मिळवले धर्मवीर म्हणून ओळखले जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना माझा व माझ्या पक्षाचा मानाचा मुजरा तर दुसरीकडे झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष नितीन भाऊ वन्ने म्हणाले छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास हा शौर्य त्याग आणि निधड्या छातीचा इतिहास आहे जो प्रत्येकाने स्वतःमध्ये रुजवला पाहिजे अन्यायाविरुद्ध पेटून उठले पाहिजे आणि प्रतिकार केला पाहिजे यावेळी पाचगणी नगरीचे माजी उपनगराध्यक्ष संतोष कांबळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ‌ विकी परिहार सामाजिक कार्यकर्ते संजय वन्ने पिंकेश सपकाळ दिलीप सपकाळ उत्तम कांबळे टेबल लँड वरील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ मोरे नितीन कांबळे ‌ वसंत कदम तसेच अभिवादन करण्याकरिता इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories: महाबळेश्वर

Related Posts

पाचगणी नगर परिषदेच्या एक मुखी ठरावानंतर पाचगणी पंचक्रोशीतील भीम आधारस्तंभ या संस्थेच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांसह नगराध्यक्ष नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.!

May 16, 2026

प्रतिनिधी पांचगणी पाचगणी नगर परिषदेच्या एक मुखी ठरावानंतर पाचगणी पंचक्रोशीतील भीम आधारस्तंभ या संस्थेच्या माध्यमातून मुख्याधिकाऱ्यांसह नगराध्यक्ष नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन…