पाचगणी शहराचे नगराध्यक्ष मा: दिलीप भाऊ बगाडे यांचा पाचगणी शहरातील आंबेडकरी समाजाच्या वतीने नागरीसत्कार..!
April 2, 2026 | सातारा
प्रतिनिधी पांचगणी
पाचगणी शहराचे नगराध्यक्ष मा: दिलीप भाऊ बगाडे यांचा पाचगणी शहरातील आंबेडकरी समाजाच्या वतीने नागरीसत्कार.!
पाचगणी शहराचे नगराध्यक्ष मा: दिलीप भाऊ बगाडे यांचा पाचगणी शहरातील आंबेडकरी समाजाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला यावेळी पाचगणी शहरातील विचारवंत शिक्षक प्रबोधनकार प्रकाश मोरे गुरुजी महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे जिल्हा अध्यक्ष श्री नितीन भाऊ वन्ने पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे दिलीत विकास आघाडीचे महाबळेश्वर ता अध्यक्ष विकी परिहार सामाजिक कार्यकर्ते रंजन कांबळे संजय वन्ने किसन गंगावणे दिलीप सपकाळ निलेश मोरे पाचगणी नगरीचे माजी उपनगराध्यक्ष संतोष कांबळे अजित मोरे आमोल चव्हाण यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते, सत्कारावेळी नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे म्हणाले माझा प्रत्येक वेळ हा मी पाच वर्षाकरिता पाचगणी करांच्या सेवेसाठी दिलेला आहे त्या अनुषंगाने कुणालाही कुठल्याही प्रकारची कसलीही अडचण असेल तर त्यांनी येऊन ती माझ्यासमोर मांडावी मी ती प्रशासकीय दृष्टिकोनातून दूर करण्याचा प्रयत्न करेन आज पर्यंत मी पाचगणी करांची सेवा करत आलो आहे आणि म्हणून पाचगणी करांच्या याच सेवे भावी मला पाचगणी करांनी नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी विराजमान केले आहे मी पाचगणी करांचा ऋणी आहे आणि म्हणून पाचगणी करांनी त्यांच्या समस्या घेऊन माझ्याकडे याव्यात मी छोट्यातील छोटी समस्या दूर करण्याचा प्रयत्न करेन व आलेल्या व्यक्तीला समाधानी करण्याचा प्रयत्न करेन हा विश्वास मी तुम्हाला देतो असे सांगत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले असता प्रकाश मोरे गुरुजी म्हणाले हा सत्कार समानतेचा व नागरिकतेचा सत्कार आहे, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांची एकच मागणी आहे की पाचगणी करांचा योग्य दृष्टिकोनातून त्यांच्या सोयीनुसार त्यांचा विकास आपल्या माध्यमातून व्हावा यासाठी आम्हीही सामाजिक दृष्टिकोनातून आपल्याला वेळोवेळी ज्या ठिकाणी समस्या निर्माण होईल ती आपल्यासमोर आणून उपस्थित करण्याचा प्रयत्न करू व त्यातून समानतेची व आपुलकीची एक क्रांती उभी राहील यावरती भर देऊ अशा प्रकारे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मनोगत व्यक्त करत पाचगणी नगरीचे नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे यांचा नागरिसत्कार आज पाचगणी येथे पार पडला..
Categories: सातारा
Related Posts
मानव निर्मित आग प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे उच्च न्यायालय, कोल्हापूर विकास बा पाटील शिरगांवकरां सह ॲड. शिवराज पाटील शिरगावकरांचा न्यायालयात जोरदार युक्तिवाद युक्तिवादानंतर प्रशासनाला अखेर न्यायालयाचे आदेश.!
March 31, 2026
प्रतिनिधी सातारा मानव निर्मित आग प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे उच्च न्यायालय, कोल्हापूर विकास बा पाटील…
मला जन्म देणारा बाप जरी वेगळा असला तरी मला समानतेचा अधिकार देऊन अन्यायाविरुद्ध लढण्याचे अधिकार प्रधान करणारा माझा दुसरा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य भाऊ गायकवाड सातार्यात 135 सहाव्या जयंतीची जोरदार तयारी.
April 13, 2026
प्रतिनिधी सातारा मला जन्म देणारा बाप जरी वेगळा असला तरी मला समानतेचा अधिकार देऊन अन्यायाविरुद्ध लढण्याचे अधिकार प्रधान करणारा माझा…
