मला जन्म देणारा बाप जरी वेगळा असला तरी मला समानतेचा अधिकार देऊन अन्यायाविरुद्ध लढण्याचे अधिकार प्रधान करणारा माझा दुसरा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य भाऊ गायकवाड सातार्यात 135 सहाव्या जयंतीची जोरदार तयारी.
April 13, 2026 | महाराष्ट्र, सातारा
प्रतिनिधी सातारा
मला जन्म देणारा बाप जरी वेगळा असला तरी मला समानतेचा अधिकार देऊन अन्यायाविरुद्ध लढण्याचे अधिकार प्रधान करणारा माझा दुसरा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य भाऊ गायकवाड सातार्यात 135 सहाव्या जयंतीची जोरदार तयारी.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साताऱ्यात ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून उत्साहात साजरी करणार असल्याचे सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य भाऊ गायकवाड यांनी सांगितले आहे आदित्य भाऊ गायकवाड म्हणाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आज तळागाळातील वंचितांचे प्रश्न मांडत आहे, समानतेच्या आणि बंधुत्वाच्या न्याय हक्कासाठी बाबासाहेबांनी आयुष्य व्यापलं त्या बाबासाहेबांच आपण काहीतरी देणे लागतो याचे भान आम्हाला आहे, आणि म्हणून साताऱ्यातील 135 सहाव्यी जयंती ही ऐतिहासिक जयंती होणार आहे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने आम्हा सगळ्यांना विचारात घेऊन 135 सहाव्या जयंतीची जोरदार तयारी केलेली आहे, ती लोकहितार्थ मान्य असून ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने देखील वेगवेगळ्या संकल्पना जिल्हाभर राबवून ही 135 सहाव्यी जयंती उत्साहात साजरी करून बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा एक छोटासा प्रयत्न ऑल इंडिया पॅंथर सेना सातारा जिल्ह्याच्या वतीने करण्यात येणार असून सर्वांनी या ऐतिहासिक उत्साहात सहभागी व्हावे असे आव्हान ऑल इंडिया पॅंथर सेना सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य भाऊ गायकवाड यांनी केले आहे.
Categories: महाराष्ट्र, सातारा
Related Posts
पाचगणी शहराचे नगराध्यक्ष मा: दिलीप भाऊ बगाडे यांचा पाचगणी शहरातील आंबेडकरी समाजाच्या वतीने नागरीसत्कार..!
April 2, 2026
प्रतिनिधी पांचगणी पाचगणी शहराचे नगराध्यक्ष मा: दिलीप भाऊ बगाडे यांचा पाचगणी शहरातील आंबेडकरी समाजाच्या वतीने नागरीसत्कार.! पाचगणी शहराचे नगराध्यक्ष मा:…
शिवसेना भाजपा या पक्षांसोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीची युती असल्याने PRP चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीप कवाडे यांना महाराष्ट्र विधानपरिषद द्या साताऱ्यातून कार्यकर्त्यांची जोरदार मागणी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करणार अनमोल कांबळे युवक जिल्हाध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी सातारा.
April 16, 2026
प्रतिनिधी सातारा शिवसेना भाजपा या पक्षांसोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीची युती असल्याने PRP चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीप कवाडे यांना महाराष्ट्र…
