महाबळेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील हे भूमाफिया आहेत की? जनतेचे सेवक आहेत? हे त्यांनी स्पष्ट करावे गाडीच्या काचा 100% काळ्या पुढे महाराष्ट्र शासनाची पाटी हा अधिकारी आहे की? भुमाफिया पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा सवाल (युवक) जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे मुख्याधिकाऱ्यांच्या कारभाराच्या निषेधार्थ आंदोलनाच्या तयारीत.!
July 25, 2026 | महाबळेश्वर
प्रतिनिधी पांचगणी
महाबळेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील हे भूमाफिया आहेत की? जनतेचे सेवक आहेत? हे त्यांनी स्पष्ट करावे गाडीच्या काचा 100% काळ्या पुढे महाराष्ट्र शासनाची पाटी हा अधिकारी आहे की? भुमाफिया पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा सवाल (युवक) जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे मुख्याधिकाऱ्यांच्या कारभाराच्या निषेधार्थ आंदोलनाच्या तयारीत.
महाबळेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी महाबळेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यापासून महाबळेश्वर शहरापासून सुरू केलेला आपल्या मनमानी कारभाराचा पाढा हा पाचगणी पर्यंत येऊन ठेवला असून याच्या निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे मुख्याधिकारी योगेश पाटील यांचा सर्व भोंगळ कारभार बाहेर काढणार असल्याचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे (युवक) जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांनी सांगितले आहे, अनमोल कांबळे म्हणाले योगेश पाटील हे महाबळेश्वर पाचगणी शहरामध्ये मनमानी धोरण राबवत असून सर्वसामान्यना एक न्याय आणि धनिकांना एक न्याय देणारे अधिकारी आहेत का ? असा असणारा प्रश्न जनतेमध्ये उपस्थित झाला आहे, इतर गोष्टी लांबच राहिल्या परंतु मुख्याधिकारी ज्या गाडीतून प्रवास करतात त्या गाडीच्या काचा पूर्णपणे 100% कळ्या करून पुढे महाराष्ट्र शासनाची पाटी लावत महाबळेश्वर पासून पाचगणी शहरांमध्ये ब्लू कंट्री हॉटेलच्या पाठीमागून ज्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामांचे जाळे पसरले आहेत अशा ठिकाणी ते फिरत असतात त्या अनुषंगाने हे मुख्याधिकारी आहेत की भूमाफीया आहेत असा असणारा संभ्रम जनतेमध्ये निर्माण झाला असून आपल्या मनमानी कारभाराच्या विरुद्ध कोणीही काहीही बोलू शकत नाही आपल्या विरुद्ध कोणीही आवाज उठवू शकत नाही हा विचार मनामध्ये ठेवत योगेश पाटील यांनी गाडीच्या काचा काळ्या करत आपला जो अधिकाऱ्यातील गुंडगिरीचा प्रवास सुरू केला आहे त्याला मुळीच महाबळेश्वर तालुक्यातील जनता स्वीकारणार नाही पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते हा यांचा मनमानी कारभार बाहेर काढण्यास सक्षम असून लवकरच योगेश पाटील यांच्या विरोधात प्रशासनाला योग्यरित्या जागा आणण्याकरिता महाबळेश्वर नगर परिषदेच्या समोर पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्यावतीने आंदोलनात्मक भूमिका घेत मुख्याधिकारी योगेश पाटील यांचा निषेध करत त्यांनी केलेल्या अनेक भ्रष्टाचाराची पोलखोल करणारा असल्याचे पक्षाचे (युवक) जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांनी सांगितले आहे, मुख्याधिकारी यांनी हे विसरू नये की ते जनतेचे सेवक आहेत ते मालक नाहीत जनतेने भरलेला टॅक्स मधून त्यांना पगार दिला जातो ते जनतेचे नोकर आहेत याच भान योगेश पाटील यांनी ठेवावे योगेश पाटील यांनी शहरातील जनतेच्या भावनांशी मनमानी कारभार केल्यास जशास तसे उत्तर पक्षाच्या वतीने देऊ अशी भूमिका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे (युवक) जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांनी मांडत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
Categories: महाबळेश्वर
Related Posts
अप्पर जिल्हाधिकारी मारहाण प्रकरणातील घटनेच्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज जिल्हाधिकारी साहेब तुम्ही जाहीर करा आणि जिल्हावासीयांना संभ्रम भूमिकेतून मुक्त करा एका व्यक्तीला मारणं सोपं परंतु अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना मारणं हा संविधानिक पदाचा अवमान आहे तो आम्ही कदापी खपवून घेणार नाही मारहाण झाली की नाही ?हे सातारा जनतेला कळू द्या अनमोल कांबळे पीपल्स रिपब्लिकन पार्टी सातारा.
July 17, 2026
प्रतिनिधी :- सातारा अप्पर जिल्हाधिकारी मारहाण प्रकरणातील घटनेच्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज जिल्हाधिकारी साहेब तुम्ही जाहीर करा आणि जिल्हावासीयांना संभ्रम भूमिकेतून…
खून खटल्यात सात वर्ष तुरुंगात असलेल्या पारधी समाजाच्या युवकाला अखेर न्याय न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता ॲड विकास बा पाटील शिरगावकर यांच्या लढ्याला यश पारधी समाजाकडून शिरगावकरांच्या लढ्याचे आभार पोलिसांनी खोटा गुन्हेगार तयार केला का ? एका निष्पापाचे सात वर्षाचे आयुष्य भरून कोण देणार यंत्रणेला ॲड शिरगावकरांचा संतप्त सवाल ?
July 25, 2026
प्रतिनिधी सातारा खून खटल्यात सात वर्ष तुरुंगात असलेल्या पारधी समाजाच्या युवकाला अखेर न्याय न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता ॲड विकास बा पाटील…
