अप्पर जिल्हाधिकारी मारहाण प्रकरणातील घटनेच्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज जिल्हाधिकारी साहेब तुम्ही जाहीर करा आणि जिल्हावासीयांना संभ्रम भूमिकेतून मुक्त करा एका व्यक्तीला मारणं सोपं परंतु अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना मारणं हा संविधानिक पदाचा अवमान आहे तो आम्ही कदापी खपवून घेणार नाही मारहाण झाली की नाही ?हे सातारा जनतेला कळू द्या अनमोल कांबळे पीपल्स रिपब्लिकन पार्टी सातारा.
July 17, 2026 | सातारा
प्रतिनिधी :-
सातारा
अप्पर जिल्हाधिकारी मारहाण प्रकरणातील घटनेच्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज जिल्हाधिकारी साहेब तुम्ही जाहीर करा आणि जिल्हावासीयांना संभ्रम भूमिकेतून मुक्त करा एका व्यक्तीला मारणं सोपं परंतु अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना मारणं हा संविधानिक पदाचा अवमान आहे तो आम्ही कदापी खपवून घेणार नाही मारहाण झाली की नाही ?हे सातारा जनतेला कळू द्या अनमोल कांबळे पीपल्स रिपब्लिकन पार्टी सातारा.
दिनांक १६ जुलै रात्रीच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील अप्पर जिल्हाधिकारी नागेश पाटील यांना मारहाण झाल्याची बातमी लोकवृत्त या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जिल्हाभर वाऱ्यागत पसरली या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात उपजिल्हाधिकाऱ्यांनाच मारहाण झाल्याच्या चर्चेने संभ्रम निर्माण झाला होता परंतु काही क्षणातच उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी अशी घटना घडलीच नाही उलट मी सदर ठिकाणी सुरू असणारा वाद हा मिटवण्याकरिता गेलो होतो असे सांगत वादावरती पडदा टाकण्याचे काम केले परंतु लोकवृत्त ने प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो नागेश पाटील हे स्वतः पोलीस स्टेशनमध्ये दिसत आहेत व त्यांचे सहकारी इतर दोन कोल्हापूर येथील असल्याचे दिसत असून ते दोघे पाटील यांचे नक्की कोण होते ? हा असणारा प्रश्न सातारा जिल्ह्यातील जनतेसमोर येऊन ठेपला आहे, ज्या ठिकाणी वाद झाला त्या ठिकाणी भेळ बनवणाऱ्या स्टॉल धारकाची नुकसान झाले असल्याचे समजत असून जर का? नुकसान झाले असेल आणि याचे साक्षीदार स्वतः या जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी नागेश पाटील असतील तर तात्काळ शासनाने संबंधित भेळ वाल्याची झालेले नुकसान भरपाई तात्काळ मदत विभागातून भरून द्यावे ज्या ठिकाणी वाद सुरू होता त्या ठिकाणी अनेक लोक उपस्थित होते असे देखील समजत आहे जर का ? अनेक लोक उपस्थित होते ? तर मग केवळ नागेश पाटीलच त्या ठिकाणी का गेले? ज्या ठिकाणी वाद सुरू होता त्या वादातील आरोपींवरती गुन्हे दाखल का केले गेले नाहीत? ते एकूण किती जण होते हे स्पष्ट का केले गेले नाही ? त्यातील काही मारहाण करणारे लोक फरार झाले का ? हा असणारा प्रश्न जिल्हा वासियांच्या समोर असून सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष उपजिल्हाधिकारी नागेश पाटील जरी सांगत असतील की मारहाणीची कुठलीही घटना त्या ठिकाणी घडली नाही तर मग स्वतः नागेश पाटील पोलीस स्टेशनला काय करत होते? आणि म्हणून आम्हाला पडलेले हे काही प्रश्न आहेत आणि त्याचे उत्तर या जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी या नात्याने नागेश पाटील यांनी आम्हाला द्यावेत कारण नागेश पाटील ही व्यक्ती महत्त्वाची नाही या जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी पद हे संविधानिक असून ते पद या जिल्ह्यावासीयांकरिता महत्त्वाचे आहे, मारहाणीत झटापटीत भेळ बनवणाऱ्या स्टॉल धारकाचे नुकसान झाले असल्यास तात्काळ शासनाने त्याला मदत करावी या आशयाचे निवेदन येत्या दोन दिवसात आम्ही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे सुपूर्त करणार आहोत जिल्हा वासियांचा संभ्रम दूर करा आणि जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखा अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना समक्ष भेटून देणार असल्याचे अनमोल कांबळे यांनी सांगितले आहे.
Categories: सातारा
Related Posts
बिनशेती परवान्याचे उल्लंघन करून बांधलेल्या मॅप्रो हेरिटेज पार्कला आर्थिक सलोखा राखून राजाश्रय देणारे साताराचे उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यावर कारवाई करा कारवाई न झाल्यास महसूलमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करू प्रणित मोरे यांचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन.!
July 13, 2026
प्रतिनिधी सातारा बिनशेती परवान्याचे उल्लंघन करून बांधलेल्या मॅप्रो हेरिटेज पार्कला आर्थिक सलोखा राखून राजाश्रय देणारे साताराचे उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यावर…
महाबळेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील हे भूमाफिया आहेत की? जनतेचे सेवक आहेत? हे त्यांनी स्पष्ट करावे गाडीच्या काचा 100% काळ्या पुढे महाराष्ट्र शासनाची पाटी हा अधिकारी आहे की? भुमाफिया पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा सवाल (युवक) जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे मुख्याधिकाऱ्यांच्या कारभाराच्या निषेधार्थ आंदोलनाच्या तयारीत.!
July 25, 2026
प्रतिनिधी पांचगणी महाबळेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील हे भूमाफिया आहेत की? जनतेचे सेवक आहेत? हे त्यांनी स्पष्ट करावे गाडीच्या…
