खून खटल्यात सात वर्ष तुरुंगात असलेल्या पारधी समाजाच्या युवकाला अखेर न्याय न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता ॲड विकास बा पाटील शिरगावकर यांच्या लढ्याला यश पारधी समाजाकडून शिरगावकरांच्या लढ्याचे आभार पोलिसांनी खोटा गुन्हेगार तयार केला का ? एका निष्पापाचे सात वर्षाचे आयुष्य भरून कोण देणार यंत्रणेला ॲड शिरगावकरांचा संतप्त सवाल ?

खून खटल्यात सात वर्ष तुरुंगात असलेल्या पारधी समाजाच्या युवकाला अखेर न्याय न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता ॲड विकास बा पाटील शिरगावकर यांच्या लढ्याला यश पारधी समाजाकडून शिरगावकरांच्या लढ्याचे आभार पोलिसांनी खोटा गुन्हेगार तयार केला का ? एका निष्पापाचे सात वर्षाचे आयुष्य भरून कोण देणार यंत्रणेला ॲड शिरगावकरांचा संतप्त सवाल ?

July 25, 2026 | सातारा

प्रतिनिधी सातारा

खून खटल्यात सात वर्ष तुरुंगात असलेल्या पारधी समाजाच्या युवकाला अखेर न्याय न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता ॲड विकास बा पाटील शिरगावकर यांच्या लढ्याला यश पारधी समाजाकडून शिरगावकरांच्या लढ्याचे आभार पोलिसांनी खोटा गुन्हेगार तयार केला का ? एका निष्पापाचे सात वर्षाचे आयुष्य भरून कोण देणार यंत्रणेला ॲड शिरगावकरांचा संतप्त सवाल.

मिळालेल्या माहितीनुसार लोणंद पोलीस ठाणे परिसरात, दि.११ जुलै २०१९ मधील एका महिलेने अंगावर रॅाकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला सदर जळीत प्रकरणात ११ पोलीस पाटील साक्षीदार होते जे दि ११/७/२०१९ रोजी पो. ठाणे लोणंद येथे सकाळी ११:०० वा हजर होते व त्यांचे या प्रकरणात जबाबही नोदविण्यात आले असल्याचे आरोपीचे वकील ॲड विकास बा पाटील शिरगावकर यांनी सांगितले आहे वाई येथील सत्र न्यायालयाने आरोपी बाळू भगवान काळे आणि केनश्या भगवान काळे यांची निर्दोष मुक्तता केली आहे प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे की या प्रकरणात बाळू भगवान काळे यांस दि.१८ जुलै २०१९ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्या नंतर तो कारागृहात होता तर दुसरीकडे, जामिनावर असलेल्या सहआरोपी केनश्या भगवान काळे यांना पोलिसांनी सन २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती.

या खटल्यात आरोपींच्या वतीने ॲड. विकास बा.पाटील-शिरगांवकर यांनी बाजू मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, तपासा दरम्यान अनेक गंभीर त्रुटी असून काही खोटे पुरावे तयार करण्यात आले. विशेषतः पोलिसांनी तयार केलेल्या पंचनाम्यावरील एका पंचाने न्यायालयात साक्ष देताना, त्या पंचनाम्यावरील सही स्वतःची नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. मात्र न्यायालयाच्या समन्सवरील सही स्वतःची असल्याचे त्याने मान्य केले. त्यामुळे पंचनाम्यावरील सही बनावट असून ती पोलिसांकडून करण्यात आल्याचा दावा बचाव पक्षाने न्यायालयासमोर केला बचाव पक्षाने याशिवाय आत्महत्येशी संबंधित ११ लेखी पुरावे ज्यांचे जबाब दि ११/७/२०१९ रोजी नोंदविलेचे सबळ पुरावा, पोलीस ठाणे परिसरात आत्महत्या केलेले घटनास्थळ असताना तो न घेता, खून केला बाबतचे खोटे घटना स्थळ तयार केले व विसंगती, तसेच खोटे मृत्यूपूर्व जबाब व जबाब देणारी वेगवेगळी नावे, अंगठा नसणे. जखमी महिला व तिची आई १२/७/२०१९-१७/७/२०१९ पर्यंत ससून हॅास्पिटल पुणे येथे असताना दि १३/७/२०१९ चे लोणंद येथील पंचनाम्सावर त्रुटी आणि तपासातील इतर महत्त्वाच्या बाबीही न्यायालयाच्या निदर्शनास आणून आरोपीचे वकील ॲड शिरगावकर यांनी दिल्या न्यायालयाचा निर्णय सर्व पुरावे, साक्षी आणि बचाव पक्षाचे मुद्दे विचारात घेतल्यानंतर वाई सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना निर्दोष मुक्त केले.

या प्रकरणात पारधी समाजातील आरोपींची बाजू ॲड. विकास बी. पाटील-शिरगांवकर यांनी त्यांचेवर झालेला अन्याय विचारात घेऊन मांडली. सदर निकालाचे पुर्ण अवलोकन केल्या नंतर, खुनाचा प्रयत्न व त्यानंतर खोटा खुनाचा गुन्हा दाखल करून, आरोपी म्हणून निरपराधी व्यक्तींचा बेकायदेशीर ताबा, अटक, त्यानंतर तयार करण्यात आलेला खोटा पुरावा तसेच खूनाचा गुन्हा घडलेला नसताना बनावट पुरावा तयार करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले या मुद्द्यांचा विचार करून नुकसान भरपाई मागण्यासाठी पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार असल्याचे आरोपीचे वकील ॲड विकास बा पाटील शिरगावकर यांच्याकडून सांगण्यात आले. सात वर्षांनंतर आरोपी निर्दोष ठरल्याने तपासाची गुणवत्ता, पुराव्यांची विश्वासार्हता आणि निष्पक्ष तपासाची गरज यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे, पोलिसांनी खोटा गुन्हेगार तयार केला का? हा असणारा प्रश्न ॲड शिरगावकर यांनी उपस्थित करताच न्यायालयात उपस्थित असणाऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण केला एक निष्पाप सात वर्षांनी बाहेर येणार असून सात वर्षात त्याचे कुटुंउध्वस्त झाले आहे, उध्वस्त झालेल्या त्याचं भवितव्य कोण भरून देणार असा सवाली आरोपीचे वकील ॲड विकास बा पाटील शिरगावकर यांनी उपस्थित करताच पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत जनतेतून शिरगावकरांच्या कार्याचे कौतुक होत असल्याचे समोर आले आहे.

Categories: सातारा

Related Posts