प्रतिनिधी महाबळेश्वर
पंचायती समिती महाबळेश्वर निवडणूक कालावधी दरम्यान मंजूर नसणाऱ्या रस्त्याच्या उद्घाटनाचे फोडण्यात आलेले नारळ बोगस महाबळेश्वर तालुक्यातील पूर्व भागातील जनतेची ग्रामस्थांनची फसवणूक फार मोठा घोटाळा दस्तुरखुद्द बांधकाम विभागाकडून उघड… जनतेची फसवणूक आणि शासनाची लूट करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात मा.उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार.. सौ पूनम गोळे
पंचायत समिती महाबळेश्वर निवडणुकीत मतदारांना आकषित करण्यासाठी भिलार गणातील 6 ते 7 गावातील लोकांना मतदारांना एकत्रित करत रस्त्याचे काम सुरू करत आहोत आणि आमच्या शिवाय तुमचा विकासच नाही रस्ता हाच विकास त्यामुळे मतदान गावच 100% झालाच पाहिजे नाहीतर बघा मग असे धमकी वजा इशारे देत नारळ फोडले गेले मात्र वास्तविक माहिती प्रशासना कडून लेखी घेतली असता सातारा जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग महाबळेश्वर यांनी 30-10-24 रोजी मौजे कासवंड आणि मौजे गोडवली येथील अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण मंजूर होऊन 16-1-25 ला पूर्ण झालेला आहे आणि मौजे भिलार येथील अंतर्गत सिमेंट काँक्रीटीकरन रस्ता 9 -12-24 ला मंजूर होऊन तो 7-2-25 ला पूर्ण झालेला आहे त्यानंतर 2025 ते 29-1- 2026 अखेर पर्यंत जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभाग महाबळेश्वर यांनी भिलार गणातील 14 गावांमध्ये एकही रस्ता मंजूर केला नाही
तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा यांचे सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाबळेश्वर यांना माहिती विचारली असता त्यांनी ही लेखी स्वरूपात लिखित कळविले आहे की आम्ही भिलार गणातील कोणत्याही गावातील रस्त्याला निधी दिलेला नाही आणि 2024 ते 17-2-26 पर्यंत तर मुळीच नाही आम्ही फक्त (आपत्ती सौम्यकरण) म्हणजेच land स्लाईड प्रणव क्षेत्रासाठी म्हणजेच संरक्षण भिंत जिथे मोठे भूस्खलन होऊन रस्त्यावर माती दरड कोसळू शकते असा निधी आमच्या खात्यामार्फत
मौजे गोडवली संरक्षक भिंत दिनांक 27-11-24 ला रक्कम 1,90,22,598 %
मौजे दानवली संरक्षक भिंत दिनांक 27-11-24 ला रक्कम 2,07,84,497%
मौजे पांघारी संरक्षक भिंत दिनांक 27-11-24 रक्कम 2,14,36,427%
मौजे भोसे संरक्षक भिंत दिनांक 27-11-24
रक्कम 1,92,01,484%
मौजे भिलार दिनाक 27-11-24 संरक्षक भिंत 2,05,44,658%
मौजे कासवंड दिनांक 3-3-25 संरक्षक भिंत रक्कम 2,10,5,743%
मौजे राजपुरी दिनांक 27-11-24 संरक्षक भिंत 1,91,49,07%
त्याशिवाय खिंगर दांडेघर तायघाट इथे मात्र लाखात रकमा असून अपिहार्य कारणाशिवाय पाहणी करूनच सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेऊनच काम करावे लागेल असे लिखित आदेश आहेत ते पण 27 नोव्हेंबर 2024 पर्यंत च
मग 2026 च्या जानेवारी फेब्रुवारी महिन्यात मतदाराना गावोगावी जाऊन ग्रामस्थांना जी खोटी रस्त्याची अमिषे दाखवली केली ती कशासाठी? महाबळेश्वर तालुक्यातील भूमिपुत्र शेतकरी सामान्य आहे शेती हा प्रमुख व्यवसाय आहे त्याच्या फार अपेक्षा राजकीय नेत्यानं पासून नाहीत सधन शेतकरी आहे त्याला लाचार समजून स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचे ध्येय मी उधळून लावणार आहे सामान्य स्वाभिमानी शेतकरी ग्रामस्थ यांची फसवणूक जर कोणी करत असेल तर त्यांना कायदेशी दणका देणारच

