पाचगणी नगरपालिका निवडणुकीमध्ये मशीन हॅक करून मी अनेक निकाल बदलले आहेत सांगणाऱ्या इरफान लकडावाला विरोधात अनमोल कांबळे यांच्याकडून मुंबई क्राईम ब्रॉंच आयुक्तालयात पुराव्यानिशी तक्रार दाखल तक्रारीत इरफान चे अंडरवर्ल्ड शी संबंध असल्याचाही आरोप.!
March 15, 2026 | महाबळेश्वर, सातारा
प्रतिनिधी पांचगणी
पाचगणी नगरपालिका निवडणुकीमध्ये मशीन हॅक करून मी अनेक निकाल बदलले आहेत सांगणाऱ्या इरफान लकडावाला विरोधात अनमोल कांबळे यांच्याकडून मुंबई क्राईम ब्रॉंच आयुक्तालयात पुराव्यानिशी तक्रार दाखल तक्रारीत इरफान चे अंडरवर्ल्ड शी संबंध असल्याचाही आरोप.
माझ्याकडे नायजेरिया देशाचे हॅकर आहेत मी जगातील कुठलीही मशीन हॅक करू शकतो मी पाचगणी नगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक निकाल रातोरात बदलले आहेत असे सांगणाऱ्या इरफान लकडावाला याच्या विरुद्ध मुंबई क्राईम ब्रॉंच आयुक्तालयात अनमोल कांबळे यांच्याकडून इरफान लकडावाला याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, अनमोल कांबळे यांनी तक्रारीत म्हटले आहे माझी ओळख इरफान लकडावाला याच्यासोबत महाबळेश्वर पंचायत समिती निवडणुकीदरम्यान झाली एका व्यक्तीने माझी ओळख इरफान लकडावाला याच्या सोबत करून दिली होती इरफान लकडावाला मला भेटल्यानंतर त्याने मला सांगितलं मी जगातील कुठलीही मशीन हॅक करू शकतो माझ्याकडे नायजेरिया देशाचे हॅकर्स आहेत व इरफान चा सहकारी असणाऱ्या व्यक्तीने त्याच नाव टोनी आहे असे इरफान याने मला सांगितले व मध्यस्थी असणाऱ्या व्यक्तीने मला सांगितले की पाचगणी नगरपालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेले काही नगरसेवक आमच्या टच मध्ये होते व कशा प्रकारे इरफान भाई यांनी मशीन हॅक केली होती त्यानंतर देशातील एका मोठ्या गुन्हेगाराच्या भावाच्या मुलाला पहाटे 4:38 मिनिटांनी केलेला मेसेज मला दाखवला होता त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं की तुमच्या सर्व सीटा या विन झाल्या आहेत, त्यानंतर इरफान याने पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उभा असणाऱ्या एका उमेदवाराच्या पतीला फोन केला आणि माझ्यासमोर सांगितले की मुझे आपसे मिलना है इलेक्शन मशीन हॅक करने के बारे मे चर्चा करनी है मै इरफान लकडावाला बात कर रहा हू त्यानंतर समोरून सांगण्यात आले ठीक है भाई मै आपको एक घंटे बाद फोन करता हु मै अभी खिंगर गाव मे प्रचार कर रहा हू त्यानंतर संबंधित व्यक्ती आणि इरफान लाकडावाला यांच्यामध्ये सायंकाळी सुमारे 8:38 ते 10:45 दरम्यान पाचगणी शहरात भेट झाली व अनेक चर्चा रंगल्या होत्या या संदर्भातील सर्व पुरावे मी मुंबई क्राईम ब्रॉंच आयुक्तालयात दिले आहेत इरफान लगडावाला याला माझ्याकडून मदत पाहिजे होती ती मदत काय आहे हे देखील मी क्राईम ब्रॉंच मध्ये दाखल केलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे, इरफान कोणासोबत बोलत होता व त्याच्या टच मध्ये पाचगणीतील व परिसरातील किती लोक होते या सर्वांचे मोबाईल नंबर मी क्राईम ब्रॉंच येथे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहेत त्या सर्वांच्या चौकशी झाल्यानंतर सर्व सत्य चव्हाट्यावरती येईल इरफान सह त्याला सहकार्य करणाऱ्या व त्याच्या सहकार्यावरती निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवरती योग्य कारवाई करत गुन्हे देखील दाखल होतील ही अपेक्षा मला आहे असे अनमोल कांबळे यांनी सांगितले.
Categories: महाबळेश्वर, सातारा
Related Posts
भिलार उंबरी परिसरात दहशत माजवणाऱ्या व बंगल्याच्या ताब्यांसह खुल्लडबाजी सारख्या अनेक तक्रारी पाचगणी पोलीस स्टेशनला दाखल असणाऱ्या निखिल भिलारे सह शशि भिलारे वरती गुन्हे दाखल करा अन्यथा पॅंथर स्टाईलने आंदोलन करू पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आशिष मोरे यांचा इशारा.!
March 12, 2026
प्रतिनिधी सातारा भिलार उंबरी परिसरात दहशत माजवणाऱ्या व बंगल्याच्या ताब्यांसह खुल्लडबाजी सारख्या अनेक तक्रारी पाचगणी पोलीस स्टेशनला दाखल असणाऱ्या निखिल…
पंचायती समिती महाबळेश्वर निवडणूक कालावधी दरम्यान मंजूर नसणाऱ्या रस्त्याच्या उद्घाटनाचे फोडण्यात आलेले नारळ बोगस महाबळेश्वर तालुक्यातील पूर्व भागातील जनतेची ग्रामस्थांनची फसवणूक फार मोठा घोटाळा दस्तुरखुद्द बांधकाम विभागाकडून उघड… जनतेची फसवणूक आणि शासनाची लूट करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात मा.उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार.. सौ पूनम गोळे.!
March 16, 2026
प्रतिनिधी महाबळेश्वर पंचायती समिती महाबळेश्वर निवडणूक कालावधी दरम्यान मंजूर नसणाऱ्या रस्त्याच्या उद्घाटनाचे फोडण्यात आलेले नारळ बोगस महाबळेश्वर तालुक्यातील पूर्व भागातील…
