पाचगणी नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन होतात पाचगणी शहरात अस्वच्छतेचा कळस कर्मचाऱ्यांची प्रचंड नाराजी प्रभाग क्रमांक ९ मध्ये मध्ये घाणीचे साम्राज्य ही वाढले मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालण्याची गरज.?



प्रतिनिधी अनमोल कांबळे 

पाचगणी नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन होतात पाचगणी शहरात अस्वच्छतेचा कळस कर्मचाऱ्यांची प्रचंड नाराजी प्रभाग क्रमांक ९ मध्ये मध्ये घाणीचे साम्राज्य ही वाढले मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालण्याची गरज.!

पाचगणी नगरपालिकेमध्ये एक मताने सत्ता स्थापन होताच पाचगणी नगरपालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे दिसून आले आहे पाचगणी नगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळी मध्ये काही नगरसेवकांचा एका सफाई कर्मचाऱ्यांने प्रचार केला होता त्याच प्रचाराचे फळ म्हणून त्याला अचानक पदोन्नती मिळाली असल्याचे समोर आले आहे, पदनियुक्ती मिळताच आनंद चव्हाण या सफाई कर्मचाऱ्यासह अन्य सफाई कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे व याचा फटका शहरातील स्वच्छतेबाबत विविध भागांमध्ये बसत आहे ज्या कर्मचाऱ्याला पदोनियुक्ती मिळाली हा तोच कर्मचारी आहे ज्याने मागील वेळेस तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांचा प्रायव्हेट ड्रायव्हर होण्याची पद मिळवले होते व अन्य कर्मचाऱ्यांच्या सांगण्यानुसार असे समजते की या कर्मचाऱ्याने तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना सांगितले होते मी गटर काढणार नाही झाडू मारणार नाही मला नगरपालिकेच्या काउंटर वरती घ्या अन्यथा मला जीव द्यावा लागेल असे सांगत याने 2019 च्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पाचगणी नगरपालिकेचा काउंटर मिळवला होता त्या वेळेस देखील कर्मचारी प्रचंड नाराज झाले होते मात्र पाचगणी नगरपालिका 2025 च्या निवडणुकीमध्ये काही उमेदवारांचा प्रचार करून आपल्याला पदनियुक्ती कशी मिळेल याच्यावरती या कर्मचाऱ्याने भर दिला व त्याचे फळ सत्ता स्थापन होताच त्याला मिळाले असल्याचे दिसून आले आहे या कर्मचाऱ्यांचे वडील देखील अध्यक्ष पदाकरिता निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते मात्र या स्थानिक राजकारणाचा फटका आता शहराला बसत असल्याचे दिसून आले आहे प्रभाग क्रमांक ९ मध्ये सिद्धार्थ नगर परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य वाढत असून निवडून दिलेले नगरसेवक देखील फिरकत नसल्याने व ठेकेदार काही नगरसेवकांचे ड्रायव्हरच झाले असल्याने याचा फटका आता सर्वसामान्यांना बसत असल्याचे दिसून आले आहे मात्र नगरसेवक लक्ष देत नसल्याने आता स्वतः मुख्य अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचा वाद मिटवून लोकांच्या हिताकरिता शहराच्या विकास कामाची दोरी आपल्या हातात घेण्याची वेळ आली आहे का? असा प्रश्न मतदार व्यक्त करत असून मुख्य अधिकारी अस्वच्छतेचे वाढलेले साम्राज्य स्वच्छ करणार का ? हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे.