उपमुख्यमंत्र्यांच्या भागात स्थानिक वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याला डंपर माफियांन कडून मारहाण कोयनेच्या खोऱ्यात लँड माफियागिरी सुरू आहे का मोरेचं नाव मात्र चर्चेत.?



प्रतिनिधी महाबळेश्वर

उपमुख्यमंत्र्यांच्या भागात स्थानिक वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याला डंपर माफियांन कडून मारहाण कोयनेच्या खोऱ्यात लँड माफियागिरी सुरू आहे का मोरेचं नाव मात्र चर्चेत.?

महाबळेश्वर तालुका अत्यंत संवेदनशील तालुका असल्याने या भागामध्ये अत्यंत साधी व सरळ मार्गे चालणारे गोरगरीब जनता पूर्वीपासून वावरत आल्याचे दिसून आले आहे अजूनही आपल्या गावातील रस्ते सुशोभीकरण व अंधार दूर करण्याच्या उद्देशाने वाट बघत बसलेल्या गरीब लोकांना आता काळ्या विकासाचा आता विळखा पडला आहे का? असा असणारा प्रश्न उपस्थित झाला आहे, विकासाच्या नावाखाली उचाटचा माफिया असणारा मोरे आपली दहशत कायम ठेवत शासनाने आखून दिलेल्या विकास कामांवरती आपली पकड मजबूत करत आहे, याच पकडीच्या आधारे त्याने वाई परिसरातील डंपर माफीयांशी हात मिळवून डंपर माफियांना तुम्ही या कोयनेच्या परिसरामध्ये काहीही करा मी आहे असे सांगत दहशतीला खत पाणी घालत दहशतीचा उच्चांक गाठला असल्याचे समोर आले आहे या स्पर्शभूमी वरती आता वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व महाबळेश्वर तालुकाध्यक्ष उत्तम भालेराव यांना या डंपर स्वरांनी रोडच्या मधी का आलास असे विचारपूस करत तू पत्रकार आहेस का असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे, मारहाण झाल्यानंतर नंतर डंपर माफिया यांच्याकडून सांगण्यात आले की तुला कोणाला नाव सांगायचं आहे त्याला आमचे नाव सांग आमच्या पाठीमागे मोरे साहेबांचा हात आहे पोलिस मोरे साहेब खिशात घेऊन फिरतात साहेब साहेबांचे खास आहेत आम्ही असे खूप कांड केले आणि मोरे साहेबांनी असे खूप कांड मुंबईवरून आलेल्या एका फोन वरती मिटवले असे सांगत उत्तम भालेराव यांना जातिवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केली असल्याचे समोर आले आहे, या घटनेनंतर उत्तम भालेराव यांनी महाबळेश्वर पोलीस स्टेशन येथे जाऊन फिर्याद दाखल केली असल्याचे उत्तम भालेराव यांनी सांगितले आहे, मात्र फिर्याद दाखल करत असताना अनेक दबाव उत्तम भालेराव यांच्यावरती आले असल्याने त्यांनी सांगितले आहे आता बघन हे आहे की या माफियांचा माफीया असणारा पोलिसांना कायद्याने योग्यरित्या तपास कराय देणार का ? फिर्यादीमध्ये दाखल असणाऱ्या गाड्या पोलीस सील करणार का ? आरोपींना पोलीस अटक करणार का ? डंपर माफियांना आशीर्वाद असणाऱ्या मोरे चे फोन कॉल चेक होणार का? नक्की कोयनेच्या बॅक वॉटर मध्ये काय काय दडल आहे? याचा तपास पोलीस करणार का? लोक दहशती खाली आहेत का? याची चौकशी करणार का? वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याला न्याय मिळणार का? हे बघन गांभीर्याचे ठरणार आहे.