प्रतिनिधी पांचगणी
माझी उमेदवारी रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी व जनतेच्या हितासाठी मी सक्षम आहे परंतु माझा मतदार सक्षम झाला पाहिजे यावरती जास्तीत जास्त भर देणार पूनम गोळे.
राज्यभर येऊन ठेपलेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये राज्यभर रंगत पाहायला मिळत असताना त्यातच आता महाबळेश्वर पंचायत समिती निवडणुकीमध्ये आणखी एक जोरदार रंगत पाहायला मिळणार आहे, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावरती भिलार गणातून कासवंड गावच्या पुनम निलेश गोळे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली असल्याने जनता अशिक्षित की सूशिक्षित लोकांच्या पाठीशी ठामपणे उभी राहते हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे, या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये पुनम गोळे म्हणाल्या खरंतर मी निवडणुकीला सामोरे जाणार नव्हते परंतु अनेक वर्षांपासून या भागाचा विस्कटलेला विकास मला पाऊसा वाटत नाही कॉंक्रिटीकरणाचे रोड झाले परंतु ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले ज्या ठिकाणी काँक्रिटी करण होतं असतं त्या ठिकाणी स्टील वापरले जाते परंतु या ठिकाणी मात्र केवळ आणि केवळ सिमेंटचा पावडर वापरून व फक्त कॉंक्रिटीकरणाचा थर देऊन सामान्य लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत निकृष्ट दर्जाचा रोड त्यांच्या हवाली करत भ्रष्टाचार करण्याचं पाप इथल्या काही प्रस्थापित व्यवस्थेने केल आहे आम्ही स्टोबेरीचे शेतकरी झालो परंतु आम्ही स्टोबेरी चे उद्योगपती होऊ शकलो नाही ही खंत मनामध्ये कायम आहे, आणि म्हणून ही निवडणूक लढणं मी गरजेचे समजते मला बोलण्यासारखं खूप आहे परंतु मी योग्य वेळ आल्यानंतर बोलणारच आहे पण सध्या मी एकच सांगते या निवडणुकीत माझा विजय झाल्यानंतर भिलार गणातील शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या मुलाला नोकरीसाठी कंपनीचे दरवाजे ठोठावे लागणार नाहीत तर प्रशासनाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शेतकरी कसा स्वावलंब व परिपूर्ण होईल या गोष्टीवरती मी जास्तीत जास्त भर देणार आहे, मग ते महाराष्ट्र शासनाचं पर्यटन संचालनालयाचा चौथा मजला असो खादी ग्राम उद्योग असो महात्मा फुले महामंडळ असो वा कलाकृती इन्व्हरमेंट असो या सर्व शासनाच्या विभागांच्या माध्यमातून माझा भिलार गणातील मतदार कसा सक्षम होईल यावरती मी जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करणार आहे मला प्रशासनातील विभागांमधला व अधिकाऱ्यांचा दांडगा अनुभव आहे, म्हणून माझ्या भागाचा विकास हा मीच सक्षमपणे करू शकते हा विचार घेऊन मी जनतेसमोर जाणार आहे आणि मला विश्वास आहे माझा विचार सुशिक्षित आणि सक्षम नेतृत्व युवा पिढी नक्की लक्षात घेऊन मला भरघोस मतांनी विजयी करेल असे पूनम गोळे यांनी सांगितले.

