वाईतील शासकीय पशु अधिकारी राम शिंदे चा अजब कारभार पदाचा गैरवापर करत धोम पाटबंधारे च्या जागेवरतीच उभारले स्वतःचे अली शान वाईट हाऊस तहसीलदार पद घरातच असल्याने तक्रारदारांना ही दमबाजी वरिष्ठांची ही हाताची घडी तोंडावरती बोट पाटबंधारे विभागाकडून मात्र अतिक्रमणाची नोटीस जारी.!
August 2, 2026 | वाई
प्रतिनिधी वाई
वाईतील शासकीय पशु अधिकारी राम शिंदे चा अजब कारभार पदाचा गैरवापर करत धोम पाटबंधारे च्या जागेवरतीच उभारले स्वतःचे अली शान वाईट हाऊस तहसीलदार पद घरातच असल्याने तक्रारदारांना ही दमबाजी वरिष्ठांची ही हाताची घडी तोंडावरती बोट पाटबंधारे विभागाकडून मात्र अतिक्रमणाची नोटीस जारी.
वाईतील शासकीय पशु अधिकारी असणाऱ्या डॉ राम शिंदे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत तसेच घरातच तहसीलदार पद असल्याने मे खडा तो सरकार से बडा म्हणत तहसीलदार पदाच्या पाठबळावरती धोम पाटबंधारे वाई या ठिकाणी धरणपात्रातच आलिशान सफेद महाल उभा केला असल्याचे समोर आले आहे, शासकीय पशु अधिकारी राम शिंदेंकडे इतकी संपत्ती आली कुठल्या मार्गाने याची चर्चा सध्या संपूर्ण वाईसह संपूर्ण जिल्ह्यात सुरू झाली आहे पशुधिकारी राम शिंदे यांच्या घरातच तहसीलदार पद नांदत असल्याने हा महसुली चमत्कार आहे का ? असा देखील असणारा प्रश्न आता विचारवंतांकडून विचारला जात आहे, या दाम्पत्याने शासकीय सर्व नियम धाब्यावरती बसवत आपल्या शासकीय दोन्ही पदांचा गैरवापर करत आलिशान सफेद महाल धोम नदीपात्रात उभारत असताना स्थानिक कठोर शासन यंत्रणा कुणाच्या दबावापोटी गप्प पडली होती? असा असणारा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात असून शासकीय पशु अधिकारी डॉक्टर राम शिंदे यांनी शासकीय नियम डावलून पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांना शासकीय सेवेतून तात्काळ बडतर्फ करा अशा आशयाची तक्रार देखील वरिष्ठांकडे दाखल झाली असल्याने तसेच धोम पाटबंधारे विभागाने पुढील उचित कारवाई करण्याकरिता शासकीय डॉक्टर पशु अधिकारी राम शिंदे यांना नोटीस काढली असून नोटीसी मध्ये म्हटले आहे की आपण नदीपात्रात अतिक्रमण केले असल्याचे समोर आले आहे त्या अनुषंगाने आपली सर्व कागदपत्रे तात्काळ कार्यालयात सादर करा अशा देखील सूचना धोम पाटबंधारे विभागाने शासकीय पशु अधिकारी डॉक्टर राम शिंदे यांना दिल्या असल्याचे समोर आले आहे.
Categories: वाई
Related Posts
पाचगणीतील जाफर भाई दिल्ली दरबार हॉटेल वरती कारवाई करा अन्न औषध प्रशासनाकडे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांची लेखी तक्रार तक्रारीत अनेक पुरावे दाखल.!
July 28, 2026
प्रतिनिधी पांचगणी पाचगणीतील जाफर भाई दिल्ली दरबार हॉटेल वरती कारवाई करा अन्न औषध प्रशासनाकडे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अनमोल…
सातारा जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या ढसाळ कारभाराच्या विरोधात पीपल्स रिपब्लिकन पक्षांने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी मुंबई येथील चित्रकूट बंगल्या बाहेर पुकारलेले आंदोलन स्थगित करा पुढील आठवड्यात बैठक घेऊन दोशींवरती कडक कारवाई करू महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्यमंत्री जयदीप कवाडे यांच्याकडे मागणी बैठकीवेळी युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे सह अन्य कार्यकर्ते उपस्थित.
August 13, 2026
सातारा जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या ढसाळ कारभाराच्या विरोधात पीपल्स रिपब्लिकन पक्षांने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी मुंबई येथील…
