सातारा जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या ढसाळ कारभाराच्या विरोधात पीपल्स रिपब्लिकन पक्षांने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी मुंबई येथील चित्रकूट बंगल्या बाहेर पुकारलेले आंदोलन स्थगित करा पुढील आठवड्यात बैठक घेऊन दोशींवरती कडक कारवाई करू महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्यमंत्री जयदीप कवाडे यांच्याकडे मागणी बैठकीवेळी युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे सह अन्य कार्यकर्ते उपस्थित.
August 13, 2026 | सातारा
प्रतिनिधी सातारा
सातारा जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या ढसाळ कारभाराच्या विरोधात पीपल्स रिपब्लिकन पक्षांने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी मुंबई येथील चित्रकूट बंगल्या बाहेर पुकारलेले आंदोलन स्थगित करा पुढील आठवड्यात बैठक घेऊन दोशींवरती कडक कारवाई करू महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्यमंत्री जयदीप कवाडे यांच्याकडे मागणी बैठकीवेळी युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे सह अन्य कार्यकर्ते उपस्थित.
दिनांक 12/8/2026 रोजी मुंबई मंत्रालय येथे सातारा जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या मनमानी कारभाराच्या संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच लघुउद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री जयदीप जी कवाडे यांनी आपले मत मांडत पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर मांडल्या संपूर्ण विषयाचा संदर्भ पाहिल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यमंत्री जयदीप कवाडे यांच्याकडे मागणी केली आहे की येत्या आठ दिवसांमध्ये मुंबई येथे पुन्हा नव्याने बैठक घेऊन या तक्रारींचे निर्मूलन करू तोपर्यंत पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने स्वातंत्र्य दिना दिवशी मुंबई येथील चित्रकूट या निवासस्थानी पुकारलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात यावे तक्रारीचे गांभीर्य ओळखून प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन जो कोणी अधिकारी दोषी आढळल्यास दोषींवरती कठोर कारवाई करू असे देखील आश्वासन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राज्यमंत्री जयदीप जी कवाडे यांना दिले आहे, यानंतर सातारा जिल्हा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांनी आपले मत मांडत म्हटले आहे की भाई जयदीप जी कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात अन्यायाला प्रतिकार करण्याचे धोरण पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सुरू असते चुकीला चूक आणि बरोबर ला बरोबर म्हणण्याचे धाडस पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, आणि म्हणून भाई जयदीप जी कवाडे हे सांगतील ते धोरण आणि ते बांधतील ते तोरण या भूमिकेतील आम्ही कार्यकर्ते असून महाराष्ट्र राज्याचे मा: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी जो शब्द दिलेला आहे, त्या शब्दाच्या अग्रस्थ राहून आम्ही आमची पक्षाची भूमिका येत्या दोन दिवसांमध्ये जाहीर करु असे सातारा जिल्हा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांनी सांगितले आहे.
Categories: सातारा
Related Posts
वाईतील शासकीय पशु अधिकारी राम शिंदे चा अजब कारभार पदाचा गैरवापर करत धोम पाटबंधारे च्या जागेवरतीच उभारले स्वतःचे अली शान वाईट हाऊस तहसीलदार पद घरातच असल्याने तक्रारदारांना ही दमबाजी वरिष्ठांची ही हाताची घडी तोंडावरती बोट पाटबंधारे विभागाकडून मात्र अतिक्रमणाची नोटीस जारी.!
August 2, 2026
वाईतील शासकीय पशु अधिकारी राम शिंदे चा अजब कारभार पदाचा गैरवापर करत धोम पाटबंधारे च्या जागेवरतीच उभारले स्वतःचे अली शान…
पाचगणीच्या मा: नगराध्यक्ष नगरसेवक लक्ष्मी कराडकर व सहकाऱ्यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना गरजू साहित्य वाटप.!
August 16, 2026
पाचगणीच्या मा: नगराध्यक्ष नगरसेवक लक्ष्मी कराडकर व सहकाऱ्यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना गरजू साहित्य वाटप साहित्य वाटपानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचा उत्साव.
