पाचगणीतील जाफर भाई दिल्ली दरबार हॉटेल वरती कारवाई करा अन्न औषध प्रशासनाकडे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांची लेखी तक्रार  तक्रारीत अनेक पुरावे दाखल.!

पाचगणीतील जाफर भाई दिल्ली दरबार हॉटेल वरती कारवाई करा अन्न औषध प्रशासनाकडे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांची लेखी तक्रार तक्रारीत अनेक पुरावे दाखल.!

July 28, 2026 | महाबळेश्वर

प्रतिनिधी पांचगणी

पाचगणीतील जाफर भाई दिल्ली दरबार हॉटेल वरती कारवाई करा अन्न औषध प्रशासनाकडे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांची लेखी तक्रार तक्रारीत अनेक पुरावे दाखल.

पाचगणी येथील जाफर भाई रेस्टॉरंट हॉटेल दिल्ली दरबार संदर्भात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांनी अन्न औषध प्रशासन विभागाकडे अनेक पुराव्यांसह हॉटेलमधील असणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या खाद्य पदार्थांसंदर्भात तक्रार दाखल केली आहे तक्रारी मध्ये अनेक पुरावे ही दाखल केले असल्याचे समजत असून अनमोल कांबळे म्हणाले पाचगणी येथील जाफरभाई हॉटेल दिल्ली दरबार येथे अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण अनेक वर्षांपासून पर्यटकांना दिलं जातं व पैशाच्या जोरावरती अधिकाऱ्यांना हाताशी धरून पर्यटकांच्या जीवाशी खेळले जात होते, परंतु अन्न औषध प्रशासन विभागाचा पदभार राज्याचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी स्वीकारल्यानंतर आता कुठेतरी पर्यटकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या धनिकांना चाप लागेल याच आशे पोटी अनेक पुराव्यांसह अन्न औषध प्रशासन विभागाकडे आम्ही लेखी तक्रार दाखल केली आहे, तक्रारीच्या अनुषंगाने विभागाने संबंधितांना म्हणणे सादर करण्याकरिता नोटीस देखील बजावली असल्याचे अनमोल कांबळे यांनी सांगितले आहे तसेच नोटीस बजावल्यानंतर हॉटेल वरती बाहेरील हॉटेलच्या फलकांना हॉटेल चालकांनी स्टिकर लावून झाकण्याच कृत्य केले असल्याचे दिसून येत आहे, याचाच अर्थ चोर तेव्हाच लपतो जेव्हा तो चोरी करतो आणि म्हणून आमच्या तक्रारीमध्ये तसेच आम्ही तक्रारीसह जोडलेल्या पुराव्यांमध्ये सत्यता आहे, म्हणूनच हॉटेल चालकाने हॉटेलमध्ये बाहेर बाजूस गेट बंद करून आता जेवणाची वेळ बदलून सायंकाळी नऊ नंतर जेवण मिळेल असे सांगणे सुरू केले आहे, परंतु अन्न औषध प्रशासनातील अधिकारी हे योग्य वेळी त्यांची योग्य कारवाई करतील असा विश्वास आम्हाला आहे कारवाई न झाल्यास योग्य वेळी योग्य भूमिका पक्षाच्यावतीने घेतली जाईल असे अनमोल कांबळे यांनी सांगितले यावेळी पक्षाचे जिल्हा महासचिव प्रणित मोरे वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते महाबळेश्वर तालूका अध्यक्ष आमोल चव्हाण उपस्थित होते.

Categories: महाबळेश्वर

Related Posts