अनिकेत कोथळे पोलीस कोठडी खून प्रकरणात तपास यंत्रणेवरच गंभीर आरोप तपास यंत्रणेलाच न्यायालयाने आरोपी करावे‌ बचाव पक्षातर्फे ॲड विकास बा पाटील शिरगांवकर यांची मागणी.!

अनिकेत कोथळे पोलीस कोठडी खून प्रकरणात तपास यंत्रणेवरच गंभीर आरोप तपास यंत्रणेलाच न्यायालयाने आरोपी करावे‌ बचाव पक्षातर्फे ॲड विकास बा पाटील शिरगांवकर यांची मागणी.!

June 21, 2026 | सातारा

प्रतिनिधी सातारा

अनिकेत कोथळे पोलीस कोठडी खून प्रकरणात तपास यंत्रणेवरच गंभीर आरोप तपास यंत्रणेलाच न्यायालयाने आरोपी करावे‌ बचाव पक्षातर्फे ॲड विकास बा पाटील शिरगांवकर यांची मागणी.

सांगली अनिकेत कोथळे पण खून प्रकरण बचाव पक्षाची मागणी

एकच घटना पण दोन गुन्हे बनावट पंचनामा आणि खरे पुरावे दडपून खोटे पुरावे तयार केल्याचा बचाव पक्षाचा न्यायालयात दावा सांगली

दिनांक: ०७/०६/२०२६ अनिकेत कोथळे पोलीस कोठडी खून प्रकरणी सांगली न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात बचाव पक्षाच्या वतीने अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला असून, त्यातील कायदेशीर व अत्यंत गंभीर मुद्द्यांवर आधारित ही प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात येत आहे बचाव पक्षाचे प्रमुख वकील अ‍ॅड. विकास बा पाटील-शिरगांवकर यांनी न्यायालयात सविस्तर युक्तिवाद सादर करताना तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच आणि हेतूंवर तीव्र आक्षेप घेतले. अ‍ॅड. विकास बा.पाटील-शिरगांवकर यांनी नमूद केले की सदर प्रकरणात दिनांक ०६/११/२०१७ रोजी गुन्हा क्र. २३८/२०१७ अंतर्गत अमोल भंडारे व अनिकेत कोथळे यांना अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यानंतर दि. ०७/११/२०१७ रोजी दोन्ही आरोपी पोलीस कोठडीतून पळून गेल्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, हा तपास सुरू असतानाच अनिकेत कोथळेचा खून झाल्याची फिर्याद तयार करून दि. ०८/११/२०१७ रोजी भा.दं.वि. कलम ३०२ अंतर्गत नवीन गुन्हा दाखल करण्यात आला. कायदेशीर दृष्ट्या एकाच घटनेवर अशा प्रकारे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करणे आणि दोन स्वतंत्र दोषारोपपत्रे (Charge sheets) दाखल करणे अत्यंत बेकायदेशीर असून, यामुळे ‘Double Jeopardy’ (एकाच गुन्ह्यासाठी दोनदा खटला) सारखा गंभीर कायदेशीर प्रश्न निर्माण झाला आहे.”

बचाव पक्षाचे प्रमुख मुद्दे आणि न्यायालयात मांडलेला युक्तिवाद:

 कायदेशीर त्रुटी आणि दोन गुन्हे: आरोपी पळून गेल्याच्या गुन्ह्याच्या तपासातच जर पोलिसांच्या मारहाणीमुळे अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला आणि प्रेत जाळल्याचे समोर आले होते, तर ती कलमे त्याच पहिल्या गुन्ह्यात वाढवणे कायद्याने बंधनकारक होते. असे न करता दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवून तपास यंत्रणेने मोठी कायदेशीर चूक केली आहे.

 पंचनाम्यातील विसंगती: शवविच्छेदन पूर्व (Inquest) पंचनामा आणि प्रत्यक्ष घटनास्थळ पंचनामा यामध्ये गंभीर आणि न भरून निघणाऱ्या विसंगती आहेत, ज्यामुळे संपूर्ण पंचनामाच संशयाच्या भोवऱ्यात येतो.

 महत्त्वाचे पुरावे दडपले घटनास्थळावरील सर्वात महत्त्वाचा तांत्रिक पुरावा असलेले CCTV आणि DVR न्यायालयात सादर करण्यात आलेले नाहीत, तसेच डेटा रिकव्हरी करण्याचे प्रयत्नही जाणीवपूर्वक टाळण्यात आले फॉरेन्सिक व DNA अहवालातील त्रुटी: न्यायालयात सादर करण्यात आलेले DNA आणि फॉरेन्सिक अहवाल अपूर्ण असून, तपास यंत्रणेने वैज्ञानिक निकष धाब्यावर बसवून अपूर्ण तपास केला आहे अलिबी (Alibi) सिद्ध: कथित घटना घडली त्या वेळी आरोपी घटनास्थळी उपस्थित नव्हते, हे बचाव पक्षाने भक्कम पुराव्यांसह न्यायालयात सिद्ध (Shabit) केले आहे खोटे पुरावे तयार केल्याचा आरोप: तपास अधिकारी यांनी स्वतः अमोल भंडारे व अनिकेत कोथळे पळून गेल्याची वस्तुस्थिती मान्य केली होती. मात्र केवळ एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी तपास यंत्रणेने जाणीवपूर्वक दिशाभूल करून, आरोपींनीच मारहाण व खून केला असा पूर्वग्रह ठेवून खोटे पुरावे निर्माण केले ठोस पुराव्यांचा अभाव: २०१७ पासून आरोपी न्यायालयीन कोठडीत असूनही, गेल्या ९ वर्षांत त्यांच्याविरुद्ध कोणताही ठोस, सबळ वैद्यकीय, हस्तलिखीत (Handwriting) किंवा रासायनिक (Chemical) पुरावा तपास यंत्रणेला सादर करता आलेला नाही.

बचाव पक्षाची अंतिम मागणी:

तपास प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष नसून ती कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावाखाली आणि खोटे पुरावे तयार करून करण्यात आली आहे. त्यामुळे खऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्याऐवजी निष्पापांना अडकवणाऱ्या तपास यंत्रणेलाच न्यायालयाने आरोपी करावे आणि या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करावी अशी आग्रही मागणी अ‍ॅड. विकास बा. पाटील-शिरगांवकर यांनी न्यायालयाकडे केली आहे.

सदर प्रकरणाचा अंतिम निकाल माननीय न्यायालयाच्या अधीन असून, पुढील अंतिम सुनावणीसाठी खटला प्रलंबित आहे अ‍ॅड विकास बा पाटील-शिरगांवकर यांनी सांगितले.

Categories: सातारा

Related Posts

या वर्षीचा वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाचा संपूर्ण खर्च राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदती करिता कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे सुपूर्त करणार कासवंड ग्रामपंचायत सदस्य निलेश गोळे.!

June 25, 2026

प्रतिनिधी पांचगणी या वर्षीचा वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाचा संपूर्ण खर्च राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदती करिता कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे…