या वर्षीचा वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाचा संपूर्ण खर्च राज्यातील दुष्काळग्रस्त  शेतकऱ्यांच्या मदती करिता कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे सुपूर्त करणार कासवंड ग्रामपंचायत सदस्य निलेश गोळे.!

या वर्षीचा वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाचा संपूर्ण खर्च राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदती करिता कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे सुपूर्त करणार कासवंड ग्रामपंचायत सदस्य निलेश गोळे.!

June 25, 2026 | महाबळेश्वर

प्रतिनिधी पांचगणी

या वर्षीचा वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाचा संपूर्ण खर्च राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदती करिता कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे सुपूर्त करणार कासवंड ग्रामपंचायत सदस्य निलेश गोळे.

कासवंड गावचे भूमिपुत्र व ग्रामपंचायत सदस्य निलेश गोळे यांनी या वर्षीचा आपला वाढदिवस साजरा न करता यावर्षी वाढदिवसा वेळी होणारा खर्च राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदती करिता राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे सुपुत्र करणारा असल्याचे सांगितले आहे. दिनांक 26/6/2026 रोजी निलेश गोळे यांचा वाढदिवस असून सालाबादप्रमाणे त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो मात्र आपण समाजाला काहीतरी देणे आहोत याचे भान प्रत्येकाला असले गरजेचे आहे. त्या अनुषंगाने या वेळेचा वाढदिवस शेतकऱ्यांसाठी साजरा करत समाजातील जागृती करणारा एक अनमोल संदेश देण्याचे ध्येय निलेश गोळे यांनी साधले असून वाढदिवसा दिनी होणाऱ्या सर्व खर्च राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे राज्यातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या या अडचणीच्या काळात मदतीकरिता सुपूर्त करणार असल्याचे निलेश गोळे यांनी सांगितले आहे या त्यांच्या नियोजनाने गाव परिसरातील लोकांकडून व सर्व सहकाऱ्यांकडून त्यांच्यावरती आनंदाचा वर्षाव होत असल्याचे समोर येत आहे.

Categories: महाबळेश्वर

Related Posts

अनिकेत कोथळे पोलीस कोठडी खून प्रकरणात तपास यंत्रणेवरच गंभीर आरोप तपास यंत्रणेलाच न्यायालयाने आरोपी करावे‌ बचाव पक्षातर्फे ॲड विकास बा पाटील शिरगांवकर यांची मागणी.!

June 21, 2026

प्रतिनिधी सातारा अनिकेत कोथळे पोलीस कोठडी खून प्रकरणात तपास यंत्रणेवरच गंभीर आरोप तपास यंत्रणेलाच न्यायालयाने आरोपी करावे‌ बचाव पक्षातर्फे ॲड…

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने वर्गीकरणा संदर्भात निघणाऱ्या मुंबई आझाद मैदान ते मंत्रालय या विराट मोर्चात बहुसंख्येने सामील व्हा जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे यांचे आंबेडकर अनुयायांना जाहीर आव्हान.!

June 26, 2026

प्रतिनिधी सातारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने वर्गीकरणा संदर्भात निघणाऱ्या मुंबई आझाद मैदान ते मंत्रालय या विराट मोर्चात बहुसंख्येने सामील व्हा…