महाबळेश्वर पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनाचा अखेर विजय मौजे भोसे येथील सर्वे नंबर 27/1 व 27/8 मध्ये उत्खननाचे काम बंद करण्याचा तहसीलदारांचा लेखी आदेश आंदोलनकर्त्यांचे समाधान आंदोलन कर्त्यांकडून आंदोलन समाप्तीची घोषणा.!
June 19, 2026 | महाबळेश्वर
प्रतिनिधी महाबळेश्वर
महाबळेश्वर पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनाचा अखेर विजय मौजे भोसे येथील सर्वे नंबर 27/1 व 27/8 मध्ये उत्खननाचे काम बंद करण्याचा तहसीलदारांचा लेखी आदेश आंदोलनकर्त्यांचे समाधान आंदोलन कर्त्यांकडून आंदोलन समाप्तीची घोषणा.
मौजे भोसे येथील सर्वे नंबर 27/1 व 27/8 26/28/29/31/32/1/2/3 मध्ये इको सेन्सिटिव्ह झोन असणाऱ्या परिसरात तहसीलदार महाबळेश्वर यांची उत्खननाची परवानगी घेत 1000 ब्रास च्या नावाखाली एक लाख ब्रास चे उत्खनन केल्याचा आरोप करत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांनी महाबळेश्वर तहसीलदार कार्यालयाबाहेर बोंबाबोंब आंदोलन पुकारले होते या आंदोलनात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे जिल्हा महासचिव प्रणित मोरे कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव सलमान पटेल मंगेश मोरे रिषभ सपकाळ व इतर सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत आंदोलन यशस्वीरित्या पार केले असल्याचे दिसून आले मौजे भोसे येथील सर्वे नंबर 27/1 व 27/8 26/28/29/31/32/1/2/3 मध्ये झालेल्या वृक्षतोडी व उत्खननाबाबत आंदोलन करत्यानी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या कारभाराचा निषेध नोंदवला आंदोलन यशस्वीरित्या पार केले यावेळी आंदोलन करत्यांना तहसीलदार सचिन मस्के यांनी लेखी पत्र देत सदरचे काम हे बंद करण्यात येत आहे असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन करतांनी आंदोलन या क्षणाला स्थगित होत आहे अशी घोषणा करत आपापली भूमिका मांडली यावेळी अनमोल कांबळे म्हणाले महाबळेश्वर तालुका हा इको सेन्सिटिव्ह झोन आहे आणि या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात उत्खननाची परवानगी ज्या प्रकारे दिली जाते हे भविष्याच्या दृष्टिकोनातून घातक आहे भविष्यात या ठिकाणी भूस्खनन होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने यापुढे उपविभागीय प्रांताधिकारी वाई तसेच जिल्हाधिकारी सातारा यांनी कुठल्याही प्रकारचे सदर ठिकाणी उत्खननास परवानगी देण्यात येऊ नये याकरिता आम्ही आमचा लढा सुरू ठेवणार आहोत कार्यकर्ता या अशा चुकीच्या गोष्टी विरोधात बोलला तरी हे भूम माफिया तक्रारदाराचे तोंड बंद करण्यासाठी तन-मन-धन तसेच बाळाचा देखील वापर करतात हे निषेध कार्य आहे याच अनुषंगाने अशा भूमाफियाना व त्यांच्या सहकाऱ्यांना कठोर शासन होण्याकरिता पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची सोमवारी भेट घेऊन निवेदनात पुरावे जोडून तक्रार देखील दाखल करणार असल्याचे अनमोल कांबळे यांनी सांगितले आहे अनमोल कांबळे म्हणाले आम्हाला विश्वास आहे या भू माफियांवरती पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे साहेब लवकरात लवकर कारवाई करतील साहेबांनी पुरावे पाहून कारवाई न केल्यास संविधानिक मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन या जिल्हात उभारू असे अनमोल कांबळे यांनी सांगितले तर जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे म्हणाले महाबळेश्वर तालुक्याचे लचके तोडणाऱ्यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी निषेध करतो आणि एकच सांगतो जेव्हा जेव्हा अशा प्रकारे चुकीच्या गोष्टी जिल्ह्याभर होतील त्या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी खंबीरपणे उभी राहील तर दुसरीकडे जिल्ह्याचे महासचिव , प्रणित मोरे म्हणाले पाचगणी आणि महाबळेश्वर परिसर हा इतका संवेदनशील भाग असताना या ठिकाणी भूम माफियागिरी फोफावलेली आहे, हिला आटोक्यात आण्णे गरजेचे आहे, आणि याकरिता पीपल्स रिपब्लिकन पार्टी खंबीर आहे, कार्यकर्त्याचं खच्चीकरण करण्याच्या अगोदर कार्यकर्त्याला बळ देऊन त्याला या चुकीच्या गोष्टी विरोधात लढायला शिकवलं पाहिजे तहसीलदारांनी जी परवानगी दिली होती ती कुठल्या नियमानुसार दिली हे अद्याप त्यांनी जाहीर केले नाही या गोष्टीचा मी निषेध करतो आणि तहसीलदारांनी काम बंद करण्याकरिता आज रोजी आंदोलनानंतर दिलेल्या आदेशाचे मी पक्षाच्यावतीने स्वागत करतो आणि एकच सांगतो अशाप्रकारे जर का चुकीच्या गोष्टी या तालुक्यात पुन्हा घडल्या तर याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे संविधानिक मार्गाने आंदोलन या तालुक्यात केले जाईल याची दक्षता तहसीलदार यांनी घ्यावी अशा प्रकारची भूमिका आंदोलकांकडून पत्रकारांशी बोलताना मांडण्यात आली.
Categories: महाबळेश्वर
Related Posts
अंडरवर्ल्ड मधील मेमन कंपनीचा हस्तक हॅकर इरफान लकडावाला याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा API साळुंखे यांचा अहवाल जाहीर करा देशद्रोही इरफान लकडावाला याचा पाचगणी नंदनवन येथील बेकायदेशीर बंगला उध्वस्त करा अनमोल कांबळे यांची निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी.!
June 13, 2026
प्रतिनिधी पांचगणी. अंडरवर्ल्ड मधील मेमन कंपनीचा हस्तक हॅकर इरफान लकडावाला याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा API साळुंखे यांचा अहवाल जाहीर…
अनिकेत कोथळे पोलीस कोठडी खून प्रकरणात तपास यंत्रणेवरच गंभीर आरोप तपास यंत्रणेलाच न्यायालयाने आरोपी करावे बचाव पक्षातर्फे ॲड विकास बा पाटील शिरगांवकर यांची मागणी.!
June 21, 2026
प्रतिनिधी सातारा अनिकेत कोथळे पोलीस कोठडी खून प्रकरणात तपास यंत्रणेवरच गंभीर आरोप तपास यंत्रणेलाच न्यायालयाने आरोपी करावे बचाव पक्षातर्फे ॲड…
