महाबळेश्वर तहसीलदार सचिन मस्कें ची धडाकेबाज कारवाई पाचगणीतील 37/15 मध्ये असणाऱ्या अनाधिकृत बांधकामा वरती हातोडा पाचगणी महाबळेश्वर मधील भू माफियांचे धाबे दणाणले.!
May 29, 2026 | महाबळेश्वर
प्रतिनिधी पांचगणी
महाबळेश्वर तहसीलदार सचिन मस्कें ची धडाकेबाज कारवाई पाचगणीतील 37/15 मध्ये असणाऱ्या अनाधिकृत बांधकामा वरती हातोडा पाचगणी महाबळेश्वर मधील भू माफियांचे धाबे दणाणले.
पाचगणी येथील सर्वे नंबर 37/15 मध्ये तहसीलदार सचिन मस्के यांची धडाकेबाज कारवाई करत अनधिकृत बांधकामावरती हातोडा उभारला आहे, ही खबर वाऱ्यागत परिसरामध्ये पसरताच बघाच्यांची गर्दीत वाढ झाली असल्याचे निदर्शनास आले आहे तहसीलदार सचिन मस्के म्हणाले सदरचे बांधकाम है पूर्णपणे अनाधिकृत व बिना परवाना आहे त्याहूनही हे डोंगराच्या टोकावरती उभारले असल्याने त्याच्या दहा मीटर पासून खाली पूर्ण तीव्रतेचा खोल दरीचा उतार आहे, त्या अनुषंगाने भविष्यात या ठिकाणाहून मोठा घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने व प्रशासनाच्या नियमानुसार सदरच्या अधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यात आली असून इथून पुढे देखील अशाच प्रकारे घनदाट जंगलामध्ये बेकायदेशीर व अनधिकृत बांधकामे निदर्शनास आल्यास कठोरात कठोर कारवाई करू बेकायदेशीर रित्या कुणीही उत्खनने केल्यास कोठोरात कठोर कारवाई करू असे तहसीलदार सचिन मस्के यांनी सांगितले आहे, या कारवाईदरम्यान पाचगणी पंचक्रोशीचे मंडळ अधिकारी रुपेश शिंदे तलाठी कांबळे तलाठी मामीळवाड व इतर अधिकारी उपस्थित होते.
Categories: महाबळेश्वर
Related Posts
राज्यमंत्री जयदीप कवाडे यांच्या महाबळेश्वर दौऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण अनेकांचा पक्षप्रवेश.!
May 25, 2026
प्रतिनिधी पांचगणी राज्यमंत्री जयदीप कवाडे यांच्या महाबळेश्वर दौऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण अनेकांचा पक्षप्रवेश. पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व लहू…
वाई शहरामध्ये फायनल प्लॉट नंबर 1101 व 1107 ब यावरील अतिक्रमण तात्काळ काढा आणि वाई नगर परिषदेतील पाणीपुरवठा अधिकारी जाधव व ठेकेदार तेज ट्रेडर्स यांच्या कामकाजाची चौकशी इथे पंधरा दिवसात करा अन्यथा वाई नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन करु पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने प्रणित मोरे यांचा इशारा.!
June 2, 2026
प्रतिनिधी वाई वाई शहरामध्ये फायनल प्लॉट नंबर 1101 व 1107 ब यावरील अतिक्रमण तात्काळ काढा आणि वाई नगर परिषदेतील पाणीपुरवठा…
