राज्यमंत्री जयदीप कवाडे यांच्या महाबळेश्वर दौऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण अनेकांचा पक्षप्रवेश.!



प्रतिनिधी पांचगणी

राज्यमंत्री जयदीप कवाडे यांच्या महाबळेश्वर दौऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण अनेकांचा पक्षप्रवेश.

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व लहू उद्योग महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री भाई जयदीप कवाडे यांचा दिनांक 24/5/2026 रोजी महाबळेश्वर तालुक्याचा अचानक रित्या दौरा ठरल्याने ते महाबळेश्वर येथे दाखल झाले दाखल होताच पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे जिल्हा संघटक प्रणित मोरे कामगार आघाडीचे अध्यक्ष विकास दादा जाधव यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले त्यानंतर वाई जावली पाचगणी महाबळेश्वर परिसरातील कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश देखील यावेळी करण्यात आले व त्यानंतर वाई येथील आनंद बुद्ध विहार येथे राज्यमंत्री जयदीप कवाडे यांनी भेट दिली भेटीदरम्यान कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना कवाडे म्हणाले हि ताकत आंबेडकर विचारधारेची आणि आंबेडकर चळवळीची आहे, कार्यकर्त्यांनी घराघरात पक्षाशे ध्येय धोरण व विचार पोचवले पाहिजेत लॉंग मार्चचे प्रणेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांचे कार्य देशाला दिशा देणारे आहे वयाच्या 90 व्या वर्षी सुद्धा प्राध्यापक कवाडे सर हे आपल्या समाजाकरिता संघर्ष करीत आहेत समाजातील छोट्यातल्या छोट्या वंचित घटकापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे शासनाची चांगली ध्येयधोरणे पोहचली पाहिजेत हा विचार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांचा आहे व तोच विचार आपल्या सर्वांना घेऊन पुढे जायचं आहे सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागा चुकीच्या विरोधात बंड पुकारा सरकार आपले आहे आपण सरकार मध्ये आहोत त्यामुळे सरकारच्या चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांना मदत करा व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देतो असे सांगत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीप कवाडे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले.