वाई शहरामध्ये फायनल प्लॉट नंबर 1101 व 1107 ब यावरील अतिक्रमण तात्काळ काढा आणि वाई नगर परिषदेतील पाणीपुरवठा अधिकारी जाधव व ठेकेदार तेज ट्रेडर्स यांच्या कामकाजाची चौकशी इथे पंधरा दिवसात करा अन्यथा वाई नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन करु पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने प्रणित मोरे यांचा इशारा.!



प्रतिनिधी वाई

वाई शहरामध्ये फायनल प्लॉट नंबर 1101 व 1107 ब यावरील अतिक्रमण तात्काळ काढा आणि वाई नगर परिषदेतील पाणीपुरवठा अधिकारी जाधव व ठेकेदार तेज ट्रेडर्स यांच्या कामकाजाची चौकशी इथे पंधरा दिवसात करा अन्यथा वाई नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन करु पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने प्रणित मोरे यांचा इशारा.

वाई नगरपरिषद हद्दीतील सिटी सर्वे नंबर 1107 ब व 1101 ब्राह्मण शाही वाई येथे रस्ता रुंदीकरणासाठी 27.194 चौरस मीटर क्षेत्र आरक्षित असून ,सदर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर एक सायकलचे भले मोठे व्यावसायिक कमर्शियल दुकान गेली दोन-तीन वर्षापासून उभे राहिले आहे नगरपरिषदेने सदर अतिक्रमण काढून रस्त्यासाठी राखीव जागा तात्काळ मोकळी करावी अशा आशयाचा या अगोदर देखील पत्रव्यवहार तीन ते चार वेळा केला असून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही .त्यानंतर मा नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याशी पत्रव्यवहार करून नगर विकास मंत्रालयामार्फत सदर गोष्टीवर कोणती कारवाई केली याचा अहवाल वाई नगर परिषदेत सादर करण्याचे नगर विकास खात्याने पत्र देऊन सुद्धा वाई नगरपरिषद त्या पत्रास हंगून सुद्धा विचारत नसल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर वाई नगर परिषदेतील पाणीपुरवठा विभागात माहिती अधिकारांतर्गत माहिती घेतली असता ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 या दरम्यान व या अगोदरही वाई नगर परिषदेच्या हद्दीत असणाऱ्या सर्व नळ कनेक्शन धारकांना स्वच्छ पाणी पुरवणे जलवाहिन्यांची दुरुस्ती करणे याचे संबंधित ठेकेदार तेज ट्रेडर्स यांना बिले अदा करण्यात आले आहेत. परंतु सदर बिलांबाबत काम पूर्ण केल्याचे अहवाल, स्थळ पाणी चे फोटो इत्यादी माहिती माहिती अधिकारात मागवली असता जन माहिती अधिकारी जाधव मॅडम यांना मुख्याधिकारी यांनी आदेश करूनही कोणतीही माहिती दिली नसल्याने पाणीपुरवठा विभागामार्फत फक्त बिले काढण्यात आली आहेत ,परंतु त्या बाबतीत कोणताही अहवाल व काम पूर्ण केल्याचे कोणतेही फोटो त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत . नक्की काम केल्याचेच पैसे मिळाले का ?काम न करताच नगर परिषदेकडून बिले काढण्याचा अनागोंदी कारभार सुरू आहे हा प्रश्न देखील निर्माण होतो. पाणीपुरवठा अधिकारी जाधव आणि ठेकेदार तेज ट्रेडर्स यांनी संगणमत करून आपले आर्थिक हितसंबंध जोपासत सदर बिले अदा करून घेतली आहेत का? असा असणाऱ्या प्रश्न उपस्थित झाला असून संबंधित ठेकेदार आणि पाणीपुरवठा अधिकारी जाधव मॅडम यांच्यावर सदर देयकांबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी वरील दोन्ही विषयांवर येत्या पंधरा दिवसांत कोणतेही सक्षम कारवाई न दिसल्यास कोणतेही लेखी उत्तर न मिळाल्यास वाई नगर परिषद कार्यालयापुढे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपअध्यक्ष, राज्यमंत्री मा.जयदीप भाई कवाडे यांचे मार्गदर्शन घेऊन,जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येईल व त्याचबरोबर तरीही दाद न दिल्यास सदर आंदोलन हे सातारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत करण्यात येईल अशी आशयाचे पत्र पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांना सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे यांनी दिले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, राष्ट्रीय मतदार सेनेचे जिल्हा संघटक विकास दादा जाधव, वाई तालुका संघटक मनोज बापू सातपुते, वाई तालुका युवक कार्याध्यक्ष आकाश गायकवाड, वाई शहर अध्यक्ष रणवीर परदेशी ,तालुका युवक उपाध्यक्ष रोहित कवळे,अजित आणि कार्यकर्ते उपस्थित होते.