प्रतिनिधी वाई
प्रणित मोरे यांचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीत जाहीर प्रवेश महासचिव पदी नियुक्ती कवाडे सरांनी दिलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडू जिल्हाभर आंबेडकरवादी विचारांच वादळ उभ करु प्रणित मोरे.
पुणे येथील झालेल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये वाई येथील प्रणित मोरे यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करताच त्यांच्या खांद्यावरती सातारा जिल्ह्यातील महासचिव पदाची जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सोपवली असल्याने आपली भूमिका स्पष्ट करत प्रणित मोरे म्हणाले लॉंग मार्चचे प्रणेते मा: प्राध्यापक खासदार आमदार जोगेंद्र कवाडे सर व तसेच लघुउद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीप कवाडे यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे व पक्षप्रवेश करताच मला जी महासचिव पदाची जबाबदारी सोपवली आहे त्या जबाबदारीचे मी पुरेपूर पालन करीन आंबेडकरवादी विचाराचा कार्यकर्ता हा घराघरात कसा तयार होईल यावरती भर देईन अन्यायाच्या विरोधात बंड पुकारण्याचे धोरण भाई जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वाखाली आखून अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन, मी एक आंबेडकरवादी कार्यकर्ता असल्याने आंबेडकरवादी विचार माझ्यासोबत आहे व हा विचार मी असंख्य कार्यकर्ते माझ्यासोबत घेऊन जिल्हाभर घराघरात पोहोचवण्याचे काम केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रणीत मोरे यांनी सांगितले.

