प्रतिनिधी सातारा
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा शफीक शेख यांची निवड कार्यकर्त्यांमध्ये आनंदा सह नाराजीचाही सूर प्रामाणिक काम करून पक्षाने काही दिले नाही शफीक शेख मात्र निष्ठेवर ठाम.
सातारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा शफीक शेख यांची शरद पवारांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते सातारा येथील प्रदान करण्यात आले या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, साहिल मुजावर, असलम सुतार, जमीर शेख, सादिक शेख, लासुर्णे, युनूस मोमीन, इम्रान शेख, अब्रार शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते शफीक शेख यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच अल्पसंख्यांक समाजाच्या विविध प्रश्नांवर सातत्याने काम केले आहे त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करत जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली असताना कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर असल्याचे दिसून आले आहे अनेक वर्ष पक्षाशी प्रामाणिक व एकनिष्ठ राहून देखील पक्षाने आमच्या नेत्याचा सामान केलं नसल्याचे कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले आहे, यानंतर शफीक शेख म्हणाले कार्यकर्त्यांच्या भावना मला समजतात पण नामदार शशिकांत शिंदे साहेब आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे माजी कृषिमंत्री शरद चंद्रजी पवार साहेब यांच्यावरची निष्ठा व प्रेम या प्रामाणिक तेच्या आणि आमच्या नेत्यांच्या कार्याने मला या पक्षात शाबूत ठेवले आहे, कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत मला विश्वास आहे पक्ष कार्यकर्त्यांना नाराज होऊ देणार नाही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान करेल मी व माझ्या सोबत असणारा माझा संपूर्ण समाज हा तेव्हाही शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत एकनिष्ठ होतो आजही आहोत आणि उद्याही राहू असे अल्पसंख्या आघाडीचे जिल्हाध्यक्ष शफीक शेख यांनी सातारा येथे सांगितले.

