भिलार उंबरी परिसरात दहशत माजवणाऱ्या व बंगल्याच्या ताब्यांसह खुल्लडबाजी सारख्या अनेक तक्रारी पाचगणी पोलीस स्टेशनला दाखल असणाऱ्या निखिल भिलारे सह शशि भिलारे वरती गुन्हे दाखल करा अन्यथा पॅंथर स्टाईलने आंदोलन करू पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आशिष मोरे यांचा इशारा.!
March 12, 2026 | महाबळेश्वर
प्रतिनिधी सातारा
भिलार उंबरी परिसरात दहशत माजवणाऱ्या व बंगल्याच्या ताब्यांसह खुल्लडबाजी सारख्या अनेक तक्रारी पाचगणी पोलीस स्टेशनला दाखल असणाऱ्या निखिल भिलारे सह शशि भिलारे वरती गुन्हे दाखल करा अन्यथा पॅंथर स्टाईलने आंदोलन करू पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आशिष मोरे यांचा इशारा
भिलार उंबरी परिसरामध्ये भर रस्त्यामध्ये गाड्या अडवून दहशत माजवत निखिल भिलारे व त्याचा सहकारी शशी भिलारे यांच्याकडून सांगितलं जात आहे की आमजे दोन मेहुने पाचगणी नगरपालिकेचे नगरसेवक आहेत असे सांगत निखिल भिलारे व त्याचा सहकारी भाऊ शशी भिलारे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन पाचगणी भिलार रस्त्यावरती चक्क दिवसा गाड्या अडवून ठोकून दमबाजी करत दहशत माजवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी माझा टँकर पुढे चालला आहे त्यामुळे इथून पुढे माझी गाडी जाईपर्यंत कुणाची ही गाडी पुढे घेऊन जाणार नाही व कुणी गेल्यास त्याची गाडी मी ठोकून टाकेन असे सांगत भर रस्त्यात निखिल भिलारे व त्याचा सहकारी शशी भिलारे या गावगुंडांनी दहशत वाजवली असल्याचे पाहायला मिळाले आहे या अनुषंगाने पाचगणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल झाली असून पाचगणी पोलीस स्टेशन व नगरसेवक यांच्याशी असणारे आरोपींचे घट्ट संबंध त्यामुळे संबंधित आरोपींवरती पाचगणी पोलीस स्टेशन कारवाई करत नसल्याचे पाहायला मिळत आहे निखिल भिलारे व शशी भिलारे याच्यावरती भिलार परिसरामध्ये बंगला हडपण्याच्या व बंगल्यामध्ये ट्रेस पास करणाऱ्या अनेक तक्रारी पाचगणी पोलीस स्टेशनला दाखल आहेत परंतु राजकीय संबंध असल्याने कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई निखिल भिलारे शशी भिलारे व त्यांच्या सहकाऱ्यांवरती पाचगणी पोलिसांकडून केली जात नसल्याचे पाहायला मिळत आहे दोन दिवसापूर्वी याच दहशतीच्या अनुषंगाने एक नवीन पाचगणी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल झाली असून तीन दिवस उलटून गेले तरी देखील पाचगणी पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची संबंधित आरोपींवरती कारवाई करण्यात आली नसल्याने आरोपींची दहशत या परिसरात किती मोठ्या प्रमाणात आहे याचे चित्र पाहायला मिळाले आहे परंतु तक्रारदाराने सांगितले आहे की आरोपींचे असणारे राजकीय वजन व त्यांचे मेहुणे हे पाचगणी नगरपरिषदेचे नगरसेवक असल्याने पाचगणी पोलीस स्टेशन मार्फत मला न्याय मिळणार नाही याची मला पूर्ण जाणीव आहे म्हणूनच येत्या आठ दिवसांमध्ये पाचगणी पोलीस स्टेशन मार्फत मला न्याय न मिळाल्याने न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे देखील तक्रारदाराने सांगितले आहे व त्या अनुषंगाने पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष मोरे यांनी आव्हान केले आहे की इतर दिवशी कारवायांचा महापूर निर्माण करणारे निखिल भिलारे व शशी भिलारे सारख्या गुंड प्रकृतीच्या लोकांवरती ज्यांच्या विरुद्ध पाचगणी पोलीस स्टेशनला ट्रेस पास करणे धमकवणे व ताबे घेण्यासारख्या तक्रारी दाखल आहेत या अशा गाव गुंडांवरती कारवाया पाचगणी पोलीस स्टेशन मार्फत कधी होणार याचे उत्तर पोलीस अधीक्षकांनी आम्हाला द्यावे अन्यथा आरोपी शशी भिलारे व निखिल भिलारे यांच्या निषेधार्थ येत्या आठ दिवसांमध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर करण्यात येणार आहे असे आशिष मोरे यांनी सांगितले.
Categories: महाबळेश्वर
Related Posts
पाचगणी येथील सिद्धार्थ नगर मध्ये जमिनीवर जबरदस्ती ताबा व खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी नगरसेवक सह गोडवली येथील एका माजी सरपंचावरती कारवाई कधी? डॉक्टर दिघेंचा सवाल.!
March 8, 2026
प्रतिनिधी पांचगणी पाचगणी येथील सिद्धार्थ नगर मध्ये जमिनीवर जबरदस्ती ताबा व खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी नगरसेवक सह गोडवली…
पाचगणी नगरपालिका निवडणुकीमध्ये मशीन हॅक करून मी अनेक निकाल बदलले आहेत सांगणाऱ्या इरफान लकडावाला विरोधात अनमोल कांबळे यांच्याकडून मुंबई क्राईम ब्रॉंच आयुक्तालयात पुराव्यानिशी तक्रार दाखल तक्रारीत इरफान चे अंडरवर्ल्ड शी संबंध असल्याचाही आरोप.!
March 15, 2026
प्रतिनिधी पांचगणी पाचगणी नगरपालिका निवडणुकीमध्ये मशीन हॅक करून मी अनेक निकाल बदलले आहेत सांगणाऱ्या इरफान लकडावाला विरोधात अनमोल कांबळे यांच्याकडून…
