पाचगणी येथील सिद्धार्थ नगर मध्ये जमिनीवर जबरदस्ती ताबा व खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी नगरसेवक सह गोडवली येथील एका माजी सरपंचावरती कारवाई कधी? डॉक्टर दिघेंचा सवाल.!
March 8, 2026 | महाबळेश्वर
प्रतिनिधी पांचगणी
पाचगणी येथील सिद्धार्थ नगर मध्ये जमिनीवर जबरदस्ती ताबा व खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी नगरसेवक सह गोडवली येथील एका माजी सरपंचावरती कारवाई कधी? डॉक्टर दिघेंचा सवाल.
पाचगणी येथील सिद्धार्थ नगर परिसरामध्ये जमिनीच्या वादातून मोठी खळबळ उडाली असून माजी नगरसेवक व त्याचा सहकारी असणारा गोडोवली येथील माजी सरपंच यांनी सिद्धार्थ नगर येथील जमिनीवर जबरदस्ती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत व्यावसायिक डॉक्टर दिघे यांच्याकडे हॉटेलला जाऊन खंडणी उकळण्याचा गंभीर आरोप डॉक्टर दिघे यांनी पाचगणी पोलीस स्टेशन येथे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये केला आहे व या संदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जमीन सुमारे ३४ वर्षांपूर्वी विक्री करण्यात आलेली असून त्यानंतरही संबंधित व्यक्तीकडून त्या जमिनीवर दावा करण्यात येत आहे. यापूर्वी या प्रकरणात न्यायालयाने संबंधित व्यक्तींना त्या जागेत प्रवेश करण्यास मनाई आदेश (Stay Order) दिलेला असल्याचेही डॉक्टर दिघे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.मात्र न्यायालयाचा आदेश असतानाही काही व्यक्तींनी एकत्र येत जेसीबी मशीनच्या सहाय्याने कुंपण तोडून जमिनीवर जबरदस्ती ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तसेच या प्रकरणात लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून संबंधित आरोपीस केवळ प्रतिबंधक नोटीस देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र इतक्या गंभीर आरोपांनंतरही आरोपीविरुद्ध अद्याप फौजदारी गुन्हा दाखल न झाल्याने तक्रारदारांनी डॉक्टर दिघे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित आरोपीविरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिवेशन सुरू असल्यामुळे, जर लवकरात लवकर योग्य कारवाई झाली नाही, तर या अधिवेशनादरम्यान विधानभवनाबाहेर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा तक्रारदारांनी दिला आहे.या प्रकरणामुळे पाचगणी परिसरात चर्चा रंगली असून सर्वसामान्यांना न्याय कधी मिळणार? व तो माजी नगरसेवक आणि गोडवली गावचा सरपंच कोण ? असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Categories: महाबळेश्वर
Related Posts
नारीशक्ती’चा गौरव करूया आणि महिलांच्या हक्कांसाठी खंबीरपणे उभे राहूया, पाचगणी नगरीच्या मा: नगराध्यक्ष व नगरसेवक लक्ष्मी कराडकर यांचे प्रतिपादन
March 8, 2026
प्रतिनिधी अनमोल कांबळे आज 8 मार्च जागतिक महिला दिन या दिनानिमित्त पाचगणी नगरीच्या लोकप्रिय मा: नगराध्यक्ष नगरसेवक लक्ष्मी कराडकर महिला…
भिलार उंबरी परिसरात दहशत माजवणाऱ्या व बंगल्याच्या ताब्यांसह खुल्लडबाजी सारख्या अनेक तक्रारी पाचगणी पोलीस स्टेशनला दाखल असणाऱ्या निखिल भिलारे सह शशि भिलारे वरती गुन्हे दाखल करा अन्यथा पॅंथर स्टाईलने आंदोलन करू पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष आशिष मोरे यांचा इशारा.!
March 12, 2026
प्रतिनिधी सातारा भिलार उंबरी परिसरात दहशत माजवणाऱ्या व बंगल्याच्या ताब्यांसह खुल्लडबाजी सारख्या अनेक तक्रारी पाचगणी पोलीस स्टेशनला दाखल असणाऱ्या निखिल…
