पाचगणी नगरपालिकेला कोणी मुख्याधिकारी देता का..? मुख्याधिकारी नसल्याने शहरातील नगरपालिकेच्या लिज मिळकती धनदांडग्यांनी रातोरात तोडल्या प्लॉट नंबर ४७९/रातोरात खाली केला.तात्पुरते मुख्याधिकारी योगेश पाटील यांचे बिल्डर लॉबीला पाडबळ कशासाठी…!



प्रतिनिधी अनमोल कांबळे

पाचगणी नगरपालिकेला कोणी मुख्याधिकारी देता का मुख्याधिकारी मुख्याधिकारी नसल्याने शहरातील नगरपालिकेच्या लिज मिळकती धनदांडग्यांनी रातोरात तोडल्या प्लॉट नंबर ४७९/रातोरात खाली केला तात्पुरते मुख्याधिकारी योगेश पाटील यांचे बिल्डर लॉबीला पडबळ कशासाठी…!

स्वच्छतेच्या नावाखाली देशभर डंका वाजवणाऱ्या पाचगणी नगरपालिकेमध्ये आता मुख्यअधिकारी नसल्याने त्या डंख्याचा पसारा सर्वत्र झाला असल्याचे शहरामध्ये पाहायला मिळत आहे पाचगणी शहराचे तत्कालीन मुख्याधिकारी निखिल जाधव यांची पदनियुक्ती झाल्यानंतर ते पाचगणी शहरातून निघून गेले मात्र त्यानंतर पाचगणी शहराच्या विकासाच्या चाव्या या महाबळेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी असणाऱ्या योगेश पाटील यांच्या हातामध्ये आल्या परंतु योगेश पाटील हे वेळोवेळी कार्यालयामध्ये उपस्थित नसल्याने व कार्यालयातील तक्रारीसह विकासाच्या दृष्टिकोनातून शहराकडे लक्ष देत नसल्याने पाचगणी शहराला कुणी मुख्य अधिकारी देता का मुख्य अधिकारी असा प्रश्न आता सर्वत्र उपस्थित झाला असल्याचे पाहायला मिळत आहे पाचगणी नगरपालिकेमध्ये मुख्य अधिकारी नसल्याने पाचगणी नगरपालिकेच्या मालकी हक्काच्या असणाऱ्या मिळकतींमध्ये नगरपालिकेच्या लिज प्रॉपर्टी या रात्तो रात तोडल्या जात आहेत व त्या ठिकाणी प्रशासनाची शासनाची नगरपालिकेची कुठलीही परवानगी न घेता शॉपिंग मॉल खोलण्याचे काम फायनल प्लॉट नंबर ४७९/ मध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे मात्र नगरपालिकेच्या मिळकतीं मध्ये ही परवानगी या बिल्डर माफिया लॉबीला प्लीज संपलेली असताना दिली कुणी ? असा असणारा प्रश्न व चर्चा संपूर्ण शहरांमध्ये सुरू झाली आहे पाचगणी नगरपालिका शेजारील फायनल प्लॉट नंबर ४७९/ हा पाचगणी नगरपालिका शेजारील असणाऱ्या मिळकतीचा फायनल प्लॉट नंबर आहे या प्लॉटमध्ये असणाऱ्या मिळकती या नगरपालिकेच्या मालकी हक्काच्या व लिज मिळकती आहेत मात्र या मिळकती पाचगणी शहराचे तात्पुरते मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी हातामध्ये नगरपालिकेचा चार्ज घेतल्यापासून रातोरात तोडल्या जात आहेत व या बिल्डर माफीया लॉबीला पाचगणी शहराचे तात्पुरते मुख्याधिकारी योगेश पाटील यांचाच पाठिंबा असल्याचे जाहीर होत असून शहरांमध्ये चर्चा मात्र जोरात सुरू आहेत यासंदर्भात नगरपालिकेमध्ये तक्रारी दाखल आहेत परंतु योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुठल्याही प्रकारची कारवाई न करता या लँड माफिया गुन्हेगारांना पाठबळ देण्याचे काम सध्या पाचगणी शहरांमध्ये जोरात सुरू असल्याने पाचगणी शहराला मुख्याधिकारी देता का कोणी मुख्य अधिकारी असा असणारा प्रश्न आता उपस्थित झाला असून येत्या काळामध्ये जिल्हाधिकारी यांनी स्वतः नगरपालिकेच्या कारभारामध्ये लक्ष घालून पाचगणी नगरपालिकेच्या मिळकती वाचावणार का? हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे.