पाचगणीतील ट्रॅफिक पोलीसांन बाबत चुकीच्या पद्धतीत आज प्रसिद्ध झालेल्या एका बातमीमुळे पाचगणी शहरातील पर्यटनावरती परिणाम ? बाहेरील पत्रकाराच्या चुकीच्या बातमी मुळे स्थानिक छोट्या व्यापाऱ्यांमध्ये नाराजी….!

पाचगणीतील ट्रॅफिक पोलीसांन बाबत चुकीच्या पद्धतीत आज प्रसिद्ध झालेल्या एका बातमीमुळे पाचगणी शहरातील पर्यटनावरती परिणाम ? बाहेरील पत्रकाराच्या चुकीच्या बातमी मुळे स्थानिक छोट्या व्यापाऱ्यांमध्ये नाराजी….!

May 28, 2025 | महाबळेश्वर

पाचगणी तील ट्रॅफिक पोलीसांन बाबत चुकीच्या पद्धतीत आज प्रसिद्ध झालेल्या एका बातमीमुळे पाचगणी शहरातील पर्यटनावरती परिणाम बाहेरील पत्रकाराच्या चुकीच्या बातमी मुळे स्थानिक छोट्या व्यापाऱ्यांमध्ये नाराजी.

प्रतिनिधी अनमोल कांबळे

देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पाचगणी मध्ये रहदारीच्या मुख्य बाजारातील ट्राफिक पोलिसांसंदर्भात एका दैनिकांमध्ये खोट्या प्रकारची बातमी आज प्रसिद्ध होताच पाचगणी शहरांमध्ये छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असल्याचे दिसून आले आहे, दैनिकांमध्ये छापले गेले आहे की पाचगणी शहरांमध्ये ट्रॅफिक पोलिसांमार्फत पर्यटकांसह स्थानिकांची लूट केली जात असल्याचे समोर आले आहे परंतु याची माहिती पाचगणी पोलीस स्टेशन येथे घेतले असता अशा कुठल्याही प्रकारची तक्रार पर्यटकांकडून अथवा स्थानिकांकडून पाचगणी पोलीस स्टेशन येथे दाखल झाली नसल्याचे समोर ‌ आले आहे, मग मात्र पाचगणी येथील ट्रॅफिक पोलिसांची बातमी शिंदेचे बदनामी शहराच्या बाहेरील पत्रकाराने कुणाच्या मर्जी खात्रीत केली का? असा असणारा प्रश्न आता पाचगणी करांच्या मनामध्ये उपस्थित झाला आहे, परंतु या बातमी मुळे पर्यटक धास्तावले असून पर्यटकांच्या मनामध्ये पाचगणी ट्रॅफिक पोलिसांविषयी संभ्रम निर्माण झाला असल्याचे पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे पर्यटकांवरती अवलंबून असणारे पाचगणी शहरातील छोटे-मोठे व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता त्यांचे असे म्हणणे आहे की पाचगणीच्या बाहेर राहून पाचगणी शहरातील चुकीच्या बातम्या लावणाऱ्या पत्रकाराला एन सीजनमध्ये छोट्या मोठ्या व्यवसायिकांना या बातमीमुळे फटका बसेल या बातमीचा परिणाम गोरगरीब व्यवसायिक जे पर्यटकांवरती अवलंबून आहेत अशा लोकांच्या त्यांच्या व्यवसाया वरती होईल या सर्व गोष्टींची जाणीव असताना त्या पत्रकाराला चुकीची बातमी छापण्याची कुणी मलय दिली होती का? व त्या पत्रकाराने ही चुकीच्या पद्धतीची बातमी कुणाच्या सांगण्यावरून की प्रसिद्धी मिळवण्या करिता केली आहे का? असा संतप्त सवाल पाचगणीतील स्थानिक छोट्या व्यापाऱ्यांनी केला आहे पाचगणी ट्रॅफिक पोलिसांची शिंदेची नाहक बदनामी करणाऱ्यां वरती पाचगणी पोलीस निरीक्षक दिलीप पवार कारवाई करणार का? असा असणारा प्रश्न उपस्थित झाला असून पाचगणी करांची लक्ष या खोटी बातमी प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकारा सह पाचगणी पोलीस निरीक्षकांच्या भूमिकेकडे लागले आहे.

Categories: महाबळेश्वर

Related Posts

भर पावसात विजांच्या कडकडात RTO प्रादेशिक विभागाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ पॅंथर आदित्य गायकवाडचा ‌ झंझावाती लढा सुरज आंदोलनाकडे सरकारची मात्र पाठ..!

May 24, 2025

भर पावसात विजांच्या कडकडात RTO प्रादेशिक विभागाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ पॅंथर आदित्य गायकवाडचा ‌ झंझावाती लढा सुरज आंदोलनाकडे सरकारची मात्र…

पाचगणी नगरपालिकेला कोणी मुख्याधिकारी देता का..? मुख्याधिकारी नसल्याने शहरातील नगरपालिकेच्या लिज मिळकती धनदांडग्यांनी रातोरात तोडल्या प्लॉट नंबर ४७९/रातोरात खाली केला.तात्पुरते मुख्याधिकारी योगेश पाटील यांचे बिल्डर लॉबीला पाडबळ कशासाठी…!

May 30, 2025

प्रतिनिधी अनमोल कांबळे पाचगणी नगरपालिकेला कोणी मुख्याधिकारी देता का मुख्याधिकारी मुख्याधिकारी नसल्याने शहरातील नगरपालिकेच्या लिज मिळकती धनदांडग्यांनी रातोरात तोडल्या प्लॉट…