प्रेरणा जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने एक लक्ष वृक्षारोपणाच्या मोहिमेला मीनलबेन मेहता कॉलेज येथे वृक्षारोपण करून सुरुवात,



प्रेरणा जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने एक लक्ष वृक्षारोपणाच्या मोहिमेला मीनलबेन मेहता कॉलेज येथे वृक्षारोपण करून सुरुवात,

पाचगणी प्रतिनिधी
प्रेरणा जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्रभर एक लक्ष वृक्षरोपणाच्या मोहिमेला सुरुवात झाली असून या मोहिमेचे उद्घाटन पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या हस्त करण्यात आले त्यानंतर पाचगणी येथील मीनलबेन मेहता कॉलेज या ठिकाणी प्राध्यापक व प्राचार्य यांच्या हातून वृक्षरोपण करून पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवण्यात आली त्याच प्रकारे पाचगणी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात आली त्यानंतर पोस्ट ऑफिस या ठिकाणी जाऊन वृक्षारोपण करण्यात आले तसेच एम एस सी बी या ठिकाणी देखील जाऊन अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले असून संस्थेचे उपाध्यक्ष अनमोल कांबळे यांनी सांगितले वृक्षरोपण करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे या देशांमध्ये झाडे लावा झाडे जगवा ही सांगण्याची वेळ येते हे चुकीचं आहे प्रत्येकाने झाडे लावून ती जगवली पाहिजेत कारण पर्यावरण आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत पर्यावरण नसते तर तुम्ही आम्ही नसतो हा संदेश ही भावना तळागाळातील लोकांपर्यंत पोचली पाहिजे तर आणि तरच पर्यावरण वाचाल आणि पर्यावरण वाचलं तर तुम्ही आम्ही वाचू आज आपण आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहिलं तर डोळ्यासमोर सह्याद्रीच्या कुशीमध्ये घाव केलेल्या जखमा आम्हाला दिसत आहेत परंतु त्या जखमा भरून काढण्याची वेळ आता आली असून एक लक्ष नव्हे तर पाच लक्ष वृक्षारोपण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही त्याच प्रकारे सर्व सन्माननीय अधिकारी शिक्षक प्राध्यापक प्राचार्य सामान्य नागरिक संस्थेचे सदस्य सभासद यांनी जो या मोहिमेला हातभार लावला त्याबद्दल त्या सर्वांचे अभिनंदन करतो असे संस्थेचे उपाध्यक्ष अनमोल कांबळे यांनी सांगितले.,