ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालया समोर पुकारलेल्या आंदोलनामध्ये चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांवरती निलंबनाच्या कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत.



सातारा प्रतिनिधी

५/७/२०२४

ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी पाटण येथे चुकीच्या पद्धतीची महिलेची शस्त्रक्रिया केल्याप्रकरणी डॉक्टर ननावरे व डॉक्टर दुबे यांना निलंबित करावे व त्याच प्रकारे भुईंज येथील कार्यरत असणाऱ्या डॉक्टर श्याम गीते यांनी मंदा सपकाळ या 108 या ॲम्बुलन्स वरती कार्यरत असणाऱ्या एका दलित मागासवर्गीय डॉक्टरचा मानसिक छळ करून अस्पृश्यांची वागणूक दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून डॉक्टर गीते यांच्या वरती देखील निलंबनाची कारवाई करावी या प्रकर मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते मात्र काल रोजी जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये, पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांना सांगण्यात आले की आपल्या मागण्या या मान्य झाल्या असून डॉक्टरांवरती निलंबनाची कारवाई होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याने ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड म्हणाले आमचा लढा हा प्रामाणिकतेचा आहे, अन्याय अत्याचाराला विरोध करणारा असून हा क्रांतिकारक लढा शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जाऊ, व समाजातील तळागळातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू तर अनमोल कांबळे म्हणाले पॅंथर सेनेच्या रूपाने या सातारा जिल्ह्यामध्ये नव्या क्रांतीची मशाल पेठवलेली आहे, आणि आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे, किया पेटवलेल्या मशालीमध्ये विद्रोहाचा विस्फोट होणार आहे, आणि राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांचे नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तळागळातील लोकांना न्याय मिळणार आहे., असे अनमोल कांबळे यांनी सांगितले,