प्रतिनिधी अनमोल कांबळे.
मूकनायक हे वृत्तपत्र टिळकांच्या केसरीचे उत्तर होतं. समाजातील शोषितांचे पिढीतांचे अस्पृश्यांचे वास्तव मांडणारे केंद्र होतं कारण टिळकांचा केसरी हा शोषितांचे पिढीतांचे अस्पृश्यांचे वास्तव मांडत नव्हता टिळकांचा केसरी हा केवळ उच्चस्तरीयांचे वास्तव मांडत होता म्हणून बाबासाहेबांनी मूकनायक या वृत्तपत्रा ची स्थापना केली ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला खरंतर तो काळ इतका भयानक होता की त्या काळामध्ये खरं वास्तव मान्य फार अवघड होतं, परंतु ते मांडण्याचं काम हे मूकनायक या वृत्तपत्राने केलं शोषितांच्या पिढीतांच्या अस्पृश्यांच्या मूकनायक मधून व्यथा मांडल्या जाऊ लागल्या आणि टिळकांच्या केसरीला उत्तर मिळू लागलं खरंतर चळवळीत काम करत असताना एखाद्या संघटनेमध्ये पक्षांमध्ये काम करत असताना तुमचे स्वतःचे वृत्तपत्र असणे फार गरजेचे आहे, कारण हे वृत्तपत्र तुम्हाला अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याची ताकद देत कारण पूर्वीचा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा पत्रकार तुमचा राहिलेला नाही? आणि जो तुमचा राहिलेला आहे तो तुमचे प्रखर वास्तव मांडणारा असावा एका निष्पापाला गुन्हेगार ठरवणारा नसावा आजचा पत्रकार तुमचा आहे का ? हे केवळ तुमच्या बाजूने तुमची व्यथा मांडली की ठरला जात नाही तर दोन्ही बाजूच्या व्यथा या प्रखरपणे मांडल्या गेल्या पाहिजेत तरच तो ठरवला जाणार आहे, अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो हे बाबासाहेबांचे वाक्य आहेत, म्हणून हजारो वर्ष गुलाम म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही या विद्रोही भ्रष्टाचारी वृत्तीच्या विरुद्ध बंड पुकारा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही बोला पाहिजे तुम्ही वाचलं पाहिजे तुम्ही लिहिल पाहिजे हीच खरी मूकनायक या वृत्तपत्राला प्रेरणा देणारी क्रांतीकारी सलाम असेल,………
अनमोल कांबळे
मो: 9130165851

