पाचगणीतील विस्कटलेल्या विकासाला माजी नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर यांच्या मार्गदर्शनाची गरज,
पाचगणी प्रतिनिधी
अनमोल कांबळे
पाचगणी गिरिस्थान नगर परिषदेच्या माध्यमातून पाचगणी शहरांमध्ये होणाऱ्या विकास विस्कटत जात असल्याचे चित्र सध्या पाचगणी शहरांमध्ये दिसत आहेत गटरे खोदले जातात रोड खोदले जातात मात्र विकास जीवित करायला प्रशासकीय यंत्रणा कुठेतरी कमी पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पाचगणी शहरांमध्ये माजी नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर यांच्या कार्यकाळामध्ये पाचगणी शहराला विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असे व त्यातून शहराचा विकास मोठ्या प्रमाणात होत असे मात्र नगराध्यक्षांचा कार्यकाळ संपल्यापासून शहराला निधीच उपलब्ध होत नसल्याने चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे, व याच कारणास्तव पाचगणी शहरात रस्ते खोदले जातात गटरे खोदली जातात मात्र विकास निधीच्या अभावी शहराचा विकास तसाच रखडला जात असल्याचे चित्र सध्या पाचगणी शहरांमध्ये पाहायला मिळत आहे, पाचगणी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी निखिल जाधव यांच्यापुढे निधी उपलब्ध करण्याचे जणू आव्हानच उभे राहिले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे ठेकेदारांना बिल मिळत नाहीत त्यातच शहराचा रखडलेला विकास हे कुठेतरी प्रशासकीय अधिकाऱ्याला न जमणारे काम शासन यंत्रणेने उभे करून दिले आहे की काय? असा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी निधी उपलब्ध करून शहरातील ठेकेदारांची रखडलेली बिले त्यामुळे शहराचा रखडलेला विकास लोकांना योग्य त्या सोयी सुविधा मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी देण्याकरिता सक्षम ठरतील का? हे पाहणे येत्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे,

