पाचगणी प्रतिनिधी – अनमोल कांबळे
दिनांक 4-7-2024 .
मोझे कासवंड ता महाबळेश्वर येथील कासवंड ते चोरमले वाडी रस्ता ग्रा मा 33 हा जिल्हा परिषद अंतर्गत येत असून शेजारील मिळकत ही धर्मेश गठाणी पुणे व इतर अशी मिळून खरेदी केलेली आहे परंतु बाहेरगावी राहायचे आणि महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी जागा घेऊन पर्यावरण नष्ट करणे भोगोलिक वातावरण बिघडवणे आणि स्वतःचे विनापरवानगी आलिशान हॉटेल रिसॉर्ट बांधणे तिथं पार्ट्या करणे कर्णकर्कश आवाज डिजे लावणे इतर बरंच काही आयोजित करत शांतता भंग करणे आणि पुढील चार पिढ्यानसाठी प्रचंड पैसा कमविणे ही एकच सुप्त इच्छा घेऊन हे महाशय इकडे दाखल होतात फुटकळ एजंट आणि कधीही फिटनेस चा फ माहीत नसणारे भुरटे आम्ही आहे अशी भुरळ घालतात आणि मग मिळकत धारक शासनाला थेट कात्रचा घाट दाखवायला सुरवात करतात असाच प्रकार कासवंड येथे करण्यास सुरुवात केली मात्र सदर रस्त्याबाबत कोणत्याही शासकीय विभागाची पूर्व परवानगी न घेता म्हणजे शासन आणि आपला काही संबंधच नाही या अविर्भावात गठाणी यांनी संपूर्ण रस्ताच नष्ट केला आणि स्वतःची मिळकत वाढवून घेतली हा सर्व प्रकार पूनम निलेश गोळे यांनी उघडकीस आणून त्याचा संपूर्ण पाठपुरावा करून शासकीय फंड किती वेळ त्या रस्त्यावर पडला याची माहिती घेतली आणि शासकीय नकाशा वरील रस्ता असं कसं कोण मुजुवून शासकीय मालमत्तेचे नुकसान अतिक्रमण कसे करतात शासन प्रशासन याचे लोकांना गांभीर्या असू नये इतके हे कोण आहेत यांना चाप बसला पाहिजे या प्रकरणी सक्षम पंचनामा पाहणी मिळकत धारकास पत्र व्यवहार करून अखेर मौजे कासवंड येथील चोरमले वस्तीतील ग्रा मा रस्ता 33 बाबत विना परवानगी रस्ता मुजवला व अतिक्रमण शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल अखेर उपअभियंता बांधकाम विभाग महाबळेश्वर यांनी शासकीय हिसका दाखवत पाचगणी पोलीस ठाण्यात पत्र देऊन श्री धर्मेश गठाणी व इतर 3 यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा तात्काळ गुन्हा करणे साठी पत्र पाठवले आहे

