रत्नागिरी सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिशे यांना न्याय मिळालाच पाहिजे, वारिशे यांचे बलिदान हे व्यर्थ जाणार नाही.. अनमोल कांबळे



,

सातारा प्रतिनिधी….

रत्नागिरीतील रिफायनरी च्या माध्यमातून बेकायदेशीर कामे करणाऱ्या आज ज्या गावगुंडांने सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिशे यांना एक्सीडेंट च्या नावाखाली गाडीखाली चिरडले गेले आहे त्या आरोपीला बेड्या ठोकल्या गेल्याच पाहिजेत पत्रकार शशिकांत वारिशे यांची ही हत्या नसून वृत्तपत्रासाठी आणि समाजासाठी त्यांनी दिलेलं हे बलिदान आहे पत्रकारिता म्हणजे काय पत्रकारितेच्या माध्यमातून कारावासाची शिक्षाच नव्हे तर प्राण त्यागले तरी चालतील परंतु ध्येय तुटले गेले नाही पाहिजे. ध्येय हे थांबले गेले नाही पाहिजे. ही शिकवण आज वारिशे हे आपल्याला देऊन गेलेले आहेत. अनेकदा या अशा घटना घडल्यानंतर या घटनांना जबाबदार हे कुठेतरी पोलीस यंत्रणा सुद्धा असती कारण आम्ही पाहतो आपण अशा धमक्या आल्यानंतर पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस ही सक्षम कारवाई करत नाहीत. पत्रकारानेच ज्याची बातमी केली याच्या विषयी लिहिले तर पत्रकारानेच याच्याकडे खंडणी मागण्याचा प्रयत्न हा केला की काय असा देखील प्रश्न हा पोलीसच उद्भवतात आणि गुन्हेगाराला पैशाकरिता पाठीशी घालण्याचे काम हे पोलीस यंत्रणा करती हे मी स्वतः अनुभवलेल आहे कारण ज्या वेळेस ठेकेदार त्या ए पी आय ला सांगतो की हो मी बेकायदेशीर काम केलेल आहे मी 30 – 35 लोकांना पैसे वाटले आहेत आणि तो नवनिर्वाचित ए पी आय हाताची घडी घालून हसत बसतो आणि माझं पण पाकीट तयार करा असं बोलतो तेव्हा पोलीस यंत्रणेवरचा विश्वास उडल्या चा विश्वास बसतो. म्हणजे लोकांच्या भावनांचा निसर्गाचा पर्यावरणाचा गुन्हेगार आरोपी हा मोकाट आणि, न्यायासाठी झटणारा वारिशे यांच्यासारखा पत्रकाराला प्रांण गमवावे लागतात ही या राज्यासाठीच नव्हे तर या देशासाठीच सगळ्यात मोठी लाजिरवाणी गोष्ट ठरलेली आहे, वारिशे यांचं बलिदान हे व्यर्थ जाणार नाही, आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी आहोत त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. अनमोल कांबळे…