पाचगणी प्रतिनिधी
देशभरात पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या व आयुष्या खंडातील दोन नंबर चे पठार मानले जाणाऱ्या पाचगणीतील टेबल लँड येथील स्थानिक राजकारणामुळे व तत्कालीन नगराध्यक्षा मुळे व नगरसेवकांच्या टक्केवारी मुळे शंभर वर्षांपासून रखडलेला टेबल लँड च्या विकासाला अखेर प्रशासकीय यंत्रणा ही पाचगणीचे मुख्य अधिकारी गिरीश दाबकेकर यांच्या हातामध्ये येताच पाचगणीच्या विकासाला गती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे या निर्णयाचे स्वागत पाचगणीतील नागरिकांपासून देशभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या तोंडून होत आहे व दापकेकर यांच्या वरती शुभेच्छांचा वर्षाव देखील होत आहे दापकेकरां मुळेच असे अनेक निर्णय आहेत जे हितकारक झालेले दिसून येत आहेत मग नगराध्यक्ष यांनी नेमलेले ठेकेदार यांना घरी पाठवणे असो किंवा स्वच्छ भारत च्या नावाखाली कलर च्या माध्यमातून काळी माया गोळा करणारा पेंटिंग कलरचा ठेकेदार असो या सर्वांचा भ्रष्टाचार दापकेकरां च्या लक्षा मध्ये येताच या सगळ्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम हे पाचगणी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी गिरीश दापकेकर यांनी करून दाखवलेल आहे व शासकीय पैसा बचत करण्याचे काम देखील मुख्य अधिकारी गिरीश दापकेकर यांनीच करून दाखवलेलं दिसून येत आहे काही ठिकाणी जरी कठोर निर्णय नसतील घेतले तरी देखील काही ठिकाणी हितकारक निर्णय हे दापकेकर यांच्या काळामध्ये च झालेले दिसून येत आहेत परंतु एकीकडे दापकेकर यांच्या निर्णयाचे स्वागत होत आहे तर दुसरीकडे स्थानिक धनदांडगे यांच्या वरती कारवाई कधी होणार अशी देखील चर्चा लोकांच्या मनामध्ये उद्भवलेली आहे, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न प्रलंबित आहे, त्यातून उद्भवणार्या काळ्या मायेचा प्रश्न प्रलंबित आहे, या देखील प्रश्नांना न्याय दापकेकर यांच्या माध्यमातून कधी मिळणार ??? आणि आम्हाला विश्वास आहे तो लवकरच मिळेल असे अनमोल कांबळे यांनी सांगितले

