महाबळेश्वर तहसील कार्यालयामध्ये १३ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या पोकलॅड माफिया कौस्तुभ भोकरे ला नक्की आश्रय कोणाचा जननायकाचा की प्रशासनाचा याची माहिती जाहीर करा अनमोल कांबळे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल.



प्रतिनिधी पांचगणी

महाबळेश्वर तहसील कार्यालयामध्ये १३ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या पोकलॅड माफिया कौस्तुभ भोकरे ला नक्की आश्रय कोणाचा जननायकाचा की प्रशासनाचा याची माहिती जाहीर करा अनमोल कांबळे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल.

महाबळेश्वर तहसील कार्यालयामध्ये गेल्या १३ वर्षांपासून क्लार्क या पदावरती कार्यरत असणार्या कौस्तुभ भोकरे याची बदली महाबळेश्वर तहसील कार्यालयातून कधी होणार अशी चर्चा सुरू होताच ऑगस्ट 2024 मध्ये खंडाळा येथे कौस्तुभ भोकरे या क्लार्कची बदली तर झाली पण कार्यालयीन बदली ही केवळ लोकांना सांगण्यापुरतीच होती की काय? अशी शंका तक्रार अनमोल कांबळे यांनी उपस्थित केली आहे, अनमोल कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या तक्रारी अर्जा मध्ये म्हटले आहे की, महाबळेश्वर तहसील कार्यालयामध्ये गेल्या 13 वर्षांपासून क्लर्क या पदावरती कार्यरत असणारा कौस्तुभ भोकरे हा क्लार्क मुळात लँड माफी आहे, या क्लार्कच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावांवरती पोकलॅण्ड जेसीबी आहेत व आपल्या क्लार्क पदाचा फायदा घेत तहसीलदार कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांच्या वर्दहस्तकाने तत्कालीन एका मंडलाधिकाऱ्याच्या माध्यमातून मंडल अधिकाऱ्यांच्या मालकीच्या असणाऱ्या पोकलँड सोबत आपला देखील पोकलॅण्ड कौस्तुभ भोकरे हा महाबळेश्वर तालुक्यामध्ये व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फिरवत असतो व इकोसिन्सेटिव्ह झोन मानल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खनन करत असतो मात्र या सर्व प्रकारच्या मागे जननायक आहेत की काय ?अशी देखील शंका मनामध्ये उपस्थित होती कारण कौस्तुभ भोकरे हा वारंवार मी जननायक आमदारांचा माणूस आहे असे सांगत असतो व इतकच नाही तर माझी ऑगस्ट 2024 मध्ये खंडाळा येथे झालेली बदली जननायक आमदारांच्या एका कार्यकर्त्याने आमदारांना सांगितल्यामुळे माझी बदली आमदारांनी थांबवली आहे, व उपविभागीय प्रांताधिकार्‍यांना जननायक आमदार यांनी आदेश दिले आहेत की कौस्तुभ भोकरे ची बदली इलेक्शन होईपर्यंत करायची नाही असा फरमानच जननायक आमदारांनी काढला आहे हे कौस्तुभ भोकरे स्वतः सर्वत्र सांगत आहेत वाटल्यास तहसील कार्यालयात बसवलेले कॅमेरे चेक करा इतकच नाही तर ही सर्व माहिती आपल्याला महाबळेश्वर तहसील कार्यालय येथील एका मंडलाधिकारी दर्जाच्या व्यक्तीने दिलेली आहे, व त्या अनुषंगाने एक गोष्ट तर खरी झालेली आहे की जर का ऑगस्ट 2024 ला कौस्तुभ भोकरे याची बदली खंडाळा येथे झाली तर मग कौस्तुभ भोकरे याला पुन्हा महाबळेश्वर तहसील कार्यालयामध्ये त्याच पदावरती कुणाच्या आशीर्वादाने का नेमण्यात आले, याचे उत्तर उपविभागीय प्रांताधिकारी वाई त्याचप्रमाणे तहसीलदार महाबळेश्वर यांनी आम्ही या प्रकरणाचे मूळ तक्रारदार असल्याकारणाने आम्हाला द्यावे महाराष्ट्रात येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती इच्छुक उमेदवारांना पराभूत करण्याचे धोरण महसूल विभागातील शासन यंत्रणा कौस्तुभ भोकरे यांना जननायकांच्या आदेशाने सांभाळून तालुक्यामध्ये राबवत आहे की काय? असा असणारा प्रश्न उपस्थित झालेला आहे, आणि म्हणून मूळचा लँड माफीया असणारा कौस्तुभ भोकरे याची जर का बदली महाबळेश्वर तालुक्यामधून झाली नाही तर येत्या आठ दिवसांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर घंटानाद आंदोलन केल्याशिवाय आम्ही सर्व कार्यकर्ते स्वस्त बसणार नाही असे अनमोल कांबळे यांनी निवेदनात म्हटले आहे व निवेदन जिल्हाधिकारी यांना सुपूर्त केले असल्याचे ही अनमोल कांबळे यांनी सांगितले यावेळी आशिष मोरे सुशांत वायदंडे आनंदा कांबळे व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.