क्रांतिकारक भगतसिंग यांची तेटली गावामध्ये नाकारलेली जयंती आज सकाळी गपचूप रित्या साजरा ग्रामसेवकाला निलंबित करा पॅंथर सेना जावली तालुका अध्यक्ष आनंदा कांबळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे मागणी.



प्रतिनिधी जावली

क्रांतिकारक भगतसिंग यांची तेटली गावामध्ये नाकारलेली जयंती आज सकाळी गपचूप रित्या साजरा ग्रामसेवकाला निलंबित करा पॅंथर सेना जावली तालुका अध्यक्ष आनंदा कांबळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे मागणी

देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत आपले बलिदान देणारे थोर क्रांतिकारक महापुरुष भगतसिंग यांची जयंती मौजे तेटली तालुका जावली जिल्हा सातारा या ठिकाणी नाकारल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जावली तालुका अध्यक्ष आनंद कांबळे हे तेटली गावचे रहिवासी असून काल दिनांक २८/९/२०२४ रोजी आनंद कांबळे सकाळी गावामध्ये 9:00: वाजता क्रांतिकारक भगतसिंग यांची जयंती साजरा करण्याकरिता गेले असता चक्क तेटली गावातील ग्रामपंचायतीला कुलूप लावण्याची धक्कादायक गोष्ट ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जावली तालुका अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी गावातल्या ग्रामपंचायत शिपायाकडे जयंती विषय विचारपूस केली असता कोण भगतसिंग अशाप्रकारे उद्धट भाषेमध्ये प्रशांत भोसले या शिपायाने आनंदा कांबळे यांना फटकारले वरून हेही सांगण्यात आले की सरपंच यांनी सांगितल आहे की ग्रामसेवक यांना गावाकडे येण्याकरिता वेळ नाही व गावांमध्ये पूर्वी देखील अशाप्रकारे जयंती साजरी झाली नाही व इथून पुढेही होणार नाही असे आनंदा कांबळे यांना ग्रामपंचायत शिपाई असणाऱ्या प्रशांत भोसले यांनी सांगितले त्यानंतर ऑल इंडिया पॅंथर सेनेचे तालुकाध्यक्ष आनंदा कांबळे यांनी ही बातमी जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांच्या कानावरती टाकता शनि आदित्य गायकवाड यांनी ताबडतोब तेटली गावच्या सरपंच यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही उद्या सकाळी जयंती साजरा करणार आहोत असे सांगून सरपंचांनी फोन कट केला व आज सकाळी देशाचे थोर क्रांतिकारक भगतसिंग यांची तेटली ग्रामपंचायत मध्ये जयंती साजरी झाली असल्याचे निदर्शनास आले परंतु या कार्यक्रमाला आनंद कांबळे यांना बोलवण्यात आले नव्हते असेही आनंदा कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले पुढे जाऊन आनंदा कांबळे म्हणाले महापुरुषांच्या जयंती या गावांमध्ये होत नाहीत व ग्रामसेवक गावामध्ये येत नाहीत म्हणून आपण जिल्हाधिकारी सातारा व जिल्हा परिषद मुख्याधिकारी सातारा यांच्याकडे ग्रामसेवक यांना निलंबित करण्याकरिता पत्र पाठवले आहे असे आनंदा कांबळे यांनी सांगितले.