महाबळेश्वर तालुक्यात सर्पमित्र अक्षय गायकवाड कडून हजारो सापांना आतापर्यंत मिळाले जीवनदान वनविभागाने सर्पमित्रांकरिता व्यासपीठ उभारण्याची गरज.!
July 11, 2026 | महाबळेश्वर
प्रतिनिधी पांचगणी
महाबळेश्वर तालुक्यात सर्पमित्र अक्षय गायकवाड कडून हजारो सापांना आतापर्यंत मिळाले जीवनदान वनविभागाने सर्पमित्रांकरिता व्यासपीठ उभारण्याची गरज
महाबळेश्वर तालुक्याला घनदाट जंगलाचा इतिहास असल्याने सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील कुशीत बसलेल्या गावांनमध्ये पावसाळा आला की प्रचंड मोठ्या प्रमाणात विषारी सापांचा आवक वाढत असून या ठिकाणी सर्पमित्रांची अत्यंत कमतरता भासत आहे, अक्षय गायकवाड या युवकाने तर आतापर्यंत एक हजाराहून अधिक विषारी सापांना पकडून जंगलामध्ये सोडून जीवनदान दिले असल्याचे समोर आले आहे, महाबळेश्वर तालुक्यामध्ये सर्पमित्र हे अत्यंत कमी असून सर्पमित्र या तालुक्यामध्ये वाढवण्याकरिता वनविभागाने अक्षय गायकवाड सारख्या सर्पमित्रांकरिता एखादे व्यासपीठ उभे करणे गरजेचे आहे, सर्प कसा पकडायचा तो किती विषारी आहे की तो विषारी नाही हे येथील शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना नागरिकांना कळणे फार गरजेचे आहे, अशा सर्व मित्रांचा शासन व्यासपीठावरती सन्मान होणे म्हणजे नव्या ऊर्जेला अभय आहे, आणि ते शासनाने सर्पमित्रांचा सन्मान करून दिले पाहिजे.
Categories: महाबळेश्वर
Related Posts
उच्च न्यायालयाच्या आदेशाची तात्काळ जिल्हा स्तरावरती तातडीने अंमलबजावणी करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ॲड विकास बा पाटील शिरगावकर यांचे निवेदन निवेदनानंतर मुख्यमंत्र्यांचे सकारात्मक उत्तर.!
July 8, 2026
प्रतिनिधी सातारा उच्च न्यायालयाच्या आदेशाची तात्काळ जिल्हा स्तरावरती तातडीने अंमलबजावणी करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ॲड विकास बा पाटील शिरगावकर…
राम कृष्ण हरी च्या गजरात कासवंड गावची चैतन्य कचरनाथ स्वामी पायीवारी श्री क्षेत्र चोरमले वाडी ते पंढरपूर पालखी पंढरपूर कडे मार्गस्थ शिवराज उद्योग समूह च्या तर्फे श्री निलेश गोकुळ गोळे यांच्याकडून वारकऱ्यांशी संवाद पाणी बॉटल सह अल्पोहर वाटप.
July 12, 2026
प्रतिनिधी पांचगणी राम कृष्ण हरी च्या गजरात कासवंड गावची चैतन्य कचरनाथ स्वामी पायीवारी श्री क्षेत्र चोरमले वाडी ते पंढरपूर पालखी पंढरपूर…
