पाचगणी येथील सर्वे नंबर 128/ मधील मिळकत धारक निवेरा शाळेच्या सातबार्या वरील पाकिस्तान नाव हटल्याने पाचगणी मध्ये पेढे वाटून आनंद उत्सव साजरा..,

पाचगणी येथील सर्वे नंबर 128/ मधील मिळकत धारक निवेरा शाळेच्या सातबार्या वरील पाकिस्तान नाव हटल्याने पाचगणी मध्ये पेढे वाटून आनंद उत्सव साजरा..,

September 14, 2024 | महाबळेश्वर

पाचगणी येथील सर्वे नंबर 128/ मधील मिळकत धारक निवेरा शाळेच्या सातबार्या वरील पाकिस्तान नाव हटल्याने पाचगणी मध्ये पेढे वाटून आनंद उत्सव साजरा..,

पाचगणी प्रतिनिधी

पाचगणी येथील सर्वे नंबर 128/ मधील मिळकत धारक निवेरा हायस्कूल यांच्या सातबार्या वरती पाकिस्तान नावाची नोंद असल्याने व सदरची नोंद अथवा कुठल्याही प्रकारची चौकशी न करण्याकरिता निवेरा शाळा संस्थाचालक हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले असल्याने सातारा जिल्हा प्रशासनाने मात्र संस्थाचालकांना चांगलाच दणका दिल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे, दिनांक 13/9/2024/ रोजी च्या मध्यरात्री सातारा जिल्हा प्रशासनाने सातबार्या वरील पाकिस्तान नावाची नोंद हटवत इंडिया अशी नोंद सातबारा दप्तरी नोंदवली असून अनमोल कांबळे यांच्या तक्रारीला अखेर मुंबई उच्च न्यायालयामध्ये अनमोल कांबळे यांनी धाव घेतल्यानंतर यश आले असून पाचगणी मध्ये पेढे वाटून फटाके फोडून पाचगणी करांनी आनंद उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केल्याचे चित्र पाहायला मिळाले., या आनंद उत्साहा वेळी ॲड डॉ अन्वर हुसेन म्हणाले हा लढा इथेच संपला नसून या लढ्याची खरी सुरुवात आता झालेली आहे व ती योग्यरित्या आम्ही न्यायालयामध्ये लढू., तर ऑल इंडिया पॅंथर सेनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष आदित्य गायकवाड म्हणाले हा क्रांतिकारक ऐतिहासिक विजय आम्ही मिळवलेला आहे, भारत देशामध्ये सातबार्या वरती चक्क पाकिस्तानची नोंद असणं म्हणजे हा देशाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या सैनिकाचा अपमान आहे व तो अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही इथून पुढे अशा प्रकारे कृत्य झाल्यास जशास तसे उत्तर कृत्य करणाऱ्याला दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते आबा मालुसरे म्हणाले अनमोल कांबळे यांनी हे काम करून प्रत्येक भारतीयाचा अभिमान उंचावलेला आहे आणि आम्हाला गर्व आहे की अशाप्रकारे इथून पुढे जेव्हा जेव्हा असे कोणी कृत्य करेल तेव्हा तेव्हा आम्ही सर्वजण एकत्र येऊन या अन्यायाविरुद्ध लढल्याशिवाय स्वस्त बसणार अनमोल कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतोच मात्र एनडीटीव्ही चे पत्रकार सुजित आंबेकर व वृत्तपत्राचे पत्रकार रवी कुचेकर यांचे देखील पाचगणी करांच्या वतीने आम्ही सर्वजण अभिनंदन करतो तर सिद्धार्थ सेवा संघाचे अध्यक्ष रंजन कांबळे म्हणाले की भारत देशाच्या सातबार्या वरती पाकिस्तान नावाची नोंद असणारी चूक पुन्हा होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी व अनमोल कांबळे यांनी केलेले काम व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले काम हे कौतुकास्पद आहे हे आपण भारतीय म्हणून कधीही विसरू शकत नाही तर अनमोल कांबळे म्हणाले की हा विजय प्रत्येक कार्यकर्त्याचा विजय आहे देशाच्या सोबत उभा राहणाऱ्या प्रत्येक सैनिकाचा विजय आहे प्रत्येक व्यक्तीचा विजय आहे
कारण देश वाचला तर तुम्ही आम्ही वाचणार आहोत आणि देश संपला तर तुम्ही आम्ही संपणार आहोत हे प्रथमंतः आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे इथून पुढे योग्यरीत्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपली बाजू मांडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी विरोधी पथकाच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापनाची पूर्ण चौकशी पूर्ण होईपर्यंत हा लढा आम्ही चालू ठेवणार आहोत असे अनमोल कांबळे यांनी सांगितले..,

Categories: महाबळेश्वर

Related Posts

पांचगणी येथील सर्वे नंबर 128/ मधील मिळकत धारक निवेरा शाळेच्या सातबार्या वरील पाकिस्तान नाव हटल्याने पाचगणी मध्ये पेढे वाटून आनंद उत्सव साजरा.

September 14, 2024

प्रतिनिधी पांचगणी पाचगणी येथील सर्वे नंबर 128/ मधील मिळकत धारक निवेरा हायस्कूल यांच्या सातबार्या वरती पाकिस्तान नावाची नोंद असल्याने व…

पांचगणी मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष पाचगणी येथील सफाई कामगारांचा मुजोरपणा वाढला फिटनेस च्या नादात शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष शहरात दुर्गंधी सफाई कामगारांसह मुकदम रणजीत जेदीया चा मुजोरपणा वाढल.

September 16, 2024

प्रतिनिधी पांचगणी पांचगणी मुख्याधिकारी निखिल जाधव यांचे कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष पाचगणी येथील सफाई कामगारांचा मुजोरपणा वाढला फिटनेस च्या नादात शहरातील स्वच्छतेकडे…