पाचगणी शहराचे तत्कालीन मुख्याधिकारी निखिल जाधव यांना पुन्हा पाचगणी शहराचा अतिरिक्त चार्ज प्रशासनाकडून जाहीर उपसचिवांनी केला आदेश पारित..!
June 6, 2025 | महाबळेश्वर
प्रतिनिधी अनमोल कांबळे
पाचगणी शहराचे तत्कालीन मुख्याधिकारी निखिल जाधव यांना पुन्हा पाचगणी शहराचा अतिरिक्त चार्ज प्रशासनाकडून जाहीर उपसचिवांनी केला आदेश पारित.
पाचगणी शहराचे डॅशिंग मुख्याधिकारी असणाऱ्या निखिल जाधव यांची पदोनियुक्ती काही दिवसांपूर्वी झाल्यानंतर पाचगणी शहरातून बदली करण्यात आली होती व पाचगणी नगर परिषदेचा अतिरिक्त चार्ज हा महाबळेश्वर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी योगेश पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला होता त्यानंतर पाचगणी शहरातील अनेक विकास कामेही रखडली गेली असल्याचे दिसून आले होते कामांना रोखठोक रित्या गती मिळत नसल्याचे पाचगणी शहरात पाहायला मिळत होते पाचगणी नगर परिषदेमध्ये तर अक्षरशः सफाई कर्मचारी असणारा अबू व त्याचा गुरु स्वतःला उपमुख्य अधिकारी समजायला लागले होते याच लोकांनी मिळून नगरपरिषदेचा फंड कुठे टाकायचा व कुठे नाही हे ठरवत अक्षरशः एका नगरपरिषदेचा कर्मचारी असणाऱ्या अबूच्या कुटुंबाच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीला शासकीय कोट्यातून काँक्रिटीकरणाचा रोड देखील मंजूर केला असल्याची सध्या पाचगणी शहरांमध्ये चर्चा सुरू झाली आहे, व याचाच पाठपुरावा वेळोवेळी लढा महाराष्ट्र चा या पोर्टलच्या बातमीने केला असल्याने या गोष्टींना लगाम देखील बसली असल्याचे दिसून आले आहे, आता उपसचिवांनी आदेश पारित केल्यानंतर पाचगणी नगर परिषदेचे तत्कालीन डॅशिंग सिंघम मानले जाणारे मुख्याधिकारी निखिल जाधव यांची पुन्हा एकदा पाचगणी नगर परिषदेच्या मुख्यधिकारी पदी निखिल जाधव हे विराजमान होणार आहेत निखिल जाधव मुख्याधिकारी पदाचा चार्ज स्वीकारला असल्याचे समजताच पाचगणी शहरातील रहिवाशांच्या व नागरिकांच्या मनामध्ये समाधान व्यक्त झाल्याचे पाहायला मिळत असून आता खरी गती पाचगणी शहराच्या विकासाला मिळणार का? हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे.
Categories: महाबळेश्वर
Related Posts
पाचगणी नगरपालिकेच्या मालकी हक्काच्या फायनल प्लॉट नंबर ४७९/मध्ये लीज हडपणार्यांकडे पाचगणी नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांचा कानाडोळा कुठल्या लोभापोटी ? पाटील साहेबांनी सांगितलय सुरू असणाऱ्या बेकायदेशीर बांधकामाकडे फिरू नका कर्मचारी.!
June 3, 2025
प्रतिनिधी अनमोल कांबळे पाचगणी नगरपालिकेच्या मालकी हक्काच्या फायनल प्लॉट नंबर ४७९/मध्ये लीज हडपणार्यांकडे पाचगणी नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांचा कानाडोळा कुठल्या…
Salute the big fighter MR Sanjay Kamble….!
June 9, 2025
वाढदिवस विशेष (लेखक) अनमोल कांबळे पाचगणी प्रतिनिधी 𝗛𝗮𝗽𝗽𝘆 𝗕𝗶𝗿𝘁𝗵𝗱𝗮𝘆 𝗠𝗿 𝗦𝗮𝗻𝗷𝗮𝘆 𝗸𝗮𝗺𝗯𝗹𝗲 𝗦𝗶𝗿 🎈🎂🥳🎉…. होय आम्ही अधिकाऱ्यातला माणूस पाहिलाय होय,…
