प्रतिनिधी अनमोल कांबळे
पाचगणी येथील पत्रकार लहू चव्हाण याच्याकडे अशी कुठली गोपनीय माहिती होती ज्या माहितीच्या आधारे पत्रकार लहू चव्हाण यांना वनसंदृष्य क्षेत्रामध्ये येणाऱ्या व लाखो रुपयांची वार्षिक उलाढाल असणाऱ्या ऐतिहासिक गुफेचा ठराव पाचगणी नगरपालिकेने करून दिला ? पाचगणी शहरासह जिल्ह्यात चर्चेला उधान.
पाचगणी टेबल लँड येथील वनसंदृष्य क्षेत्रामध्ये येणाऱ्या ऐतिहासिक गुफीचा वाद पाचगणी नगरपालिका व बोडस नावाच्या व्यक्तीचा मेहरबान न्यायालयामध्ये सुरू आहे परंतु बोर्डस हे आता हयातीत नसल्यामुळे पाचगणी नगरपालिका हद्दीमध्ये टेबल लँड येथे येणाऱ्या वनसंदृष्य क्षेत्रामध्ये ऐतिहासिक गुफेचा ठराव पाचगणी नगरपालिकेने परस्पर मंजूर करून पत्रकार लहू चव्हाण यांना न्यायालयामध्ये वाद सुरू असताना करून दिला असल्याने काही सामाजिक कार्यकर्त्यांनी काल पाचगणी नगरपालिकेच्या दारामध्ये उपोषण सुरू केले आहे, लहू चव्हाण हे एका सातारातील विशिष्ट वृत्तपत्राचे पत्रकार असून थेट पत्रकाराच्या नावाने हा ठराव पाचगणी नगरपालिकेने करून दिला असल्याने तक्रारदारांनी लहू चव्हाण यांच्या नावाने पाचगणी नगरपालिकेमध्ये तक्रार दाखल करत उपोषणाचा मार्ग निवडला आहे, पाचगणी नगरपालिकेबद्दल पत्रकार लहू चव्हाण यांच्याकडे अशी कुठली गोपनीय माहिती होती ज्या माहितीच्या आधारे त्यांना लाखो रुपयांची वार्षिक उलाढाल असणाऱ्या ऐतिहासिक वनसंदृश्य क्षेत्रामध्ये येणाऱ्या टेबल लँड येथील गुफेचा ठराव करून दिला आहे, पाचगणी नगरपालिका पर्यटकांकडून टेबल लँड या ठिकाणी जात असताना प्रदूषण नियंत्रण कर वसूल करते परंतु टेबल लँड या ठिकाणी गेल्यानंतर या ऐतिहासिक गुफेमध्ये जायचे असल्यास त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला कर भरायचा आहे हे पर्यटकांच्या लक्षामध्ये येते याचाच अर्थ शासकीय कर भरून देखील प्रायव्हेट कर पर्यटकांकडून या ठिकाणी जबरदस्तीने वसूल केला जातो दरवर्षी पाचगणी येथील टेबल लँड या ठिकाणी लाखो पर्यटक भेट देत असतात त्याच आधारे पर्यटकांकडून जबरदस्तीने गुफेमध्ये जायचे असल्यास गोळा करण्यात येणारा लाखो रुपयांचा हा काळ्या बाजाराचा कर नक्की जातो तरी कुणाच्या खिशात? असा असणारा प्रश्न पाचगणी येथील नागरिकांना पडला असून कुठलाही पाचगणी शहरातील पत्रकार या गंभीर विषयाची बातमी करण्यास तयार नसल्याने पाचगणी नगरपालिका प्रशासनानाची अशी कुठली बातमी पत्रकार लहू चव्हाण यांच्याकडे होती ज्या बातमीच्या आधारे त्यांना परस्पर हा ठराव करून देण्यात आला आहे, अशी चर्चा संपूर्ण शहरासह जिल्ह्यामध्ये सुरू असून आंदोलनकर्त्यांनी उपोषणाचा मार्ग पाचगणी नगरपालिकेच्या दारामध्ये स्वीकारला असून पाचगणी नगरपालिका प्रशासन व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वनसंदृश्य क्षेत्रामध्ये पत्रकार लहू चव्हाण वापरत असणाऱ्या गुफेवरती कारवाई होणार का? गुफा सील होणार का ? आंदोलन करत्यांना न्याय मिळणार का? हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे.

