बैल पोळा मिरवणुकीत महिलांचा अश्लील डान्स.!
August 30, 2026 | महाबळेश्वर
प्रतिनिधी पांचगणी
बैल पोळा मिरवणुकीत महिलांचा अश्लील डान्स करून पाचगणी शहराची प्रतिमा मलीन करणारा शुभम दुधाने वरती अखेर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीनंतर पाचगणी पोलिसांकडून गुन्हा दाखल अनमोल कांबळे च्या तक्रारीला अखेर यश पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा विजय.
शैक्षणिक व सुसंस्कृत शहर मानले जाणाऱ्या पाचगणी शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये बायकांचे अश्लील नृत्य करत व समाजामध्ये अश्लीलता पसरवणार्या शुभम दुधाने याच्यावरती अखेर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांच्या तक्रारीनंतर पाचगणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचे समोर आले आहे अशा आशयाचे पत्र अनमोल कांबळे यांना पोलिसांमार्फत देण्यात आले असून, केलेल्या कारवाईची प्रत पोलिसांनी अनमोल कांबळे यांना सुपूर्त केली आहे अनमोल कांबळे म्हणाले ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतरच पाचगणी पोलिसांकडून करण्यात आली आहे पाचगणी पोलीस हे प्रकरण दाबण्याकरिता पाहत होते परंतु आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत होतो अखेर आम्ही पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची भेट घेऊन संपूर्ण विषय निखिल पिंगळे यांना तक्रारीच्या माध्यमातून सांगितला व त्यानंतरच पाचगणी शहराची प्रतिमा मलिन करणारा शुभम दुधाने नितीन दुधाने यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी पीपल्स रिपब्लिकन पक्षाची प्रामुख्याने मागणी असताना केवळ नितीन दुधाने यांने मिरवणुकीची परवानगी घेतली होती परंतु शुभम दुधाने याने बायकांची अश्लीलता पसरवत अश्लील डान्स मुख्य बाजारपेठेत संविधान चौकामध्ये करताना परवानगी घेतली नव्हती असे सांगत पोलिसांनी केवळ शुभम दुधाने याच्या वरतीच गुन्हा दाखल केला असल्याचे पत्रात सांगण्यात आले आहे कारवाईचे पत्र तक्रारदार असणाऱ्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांना पाचगणी पोलिसांनी दिले असून अनमोल कांबळे आपला पुढील लढा जोपर्यंत शहराची प्रतिमा व शहरांमध्ये बायकांच्या माध्यमातून अश्लीलता पसरवणाऱ्या या रॅकेटचा मास्टरमाई नितीन दुधाने वरती गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचे अनमोल कांबळे यांनी सांगितले आहे.
Categories: महाबळेश्वर
Related Posts
ॲड शैलेश निकम यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्षामध्ये जाहीर प्रवेश.!
August 23, 2026
जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत साताऱ्यात ॲड शैलेश निकम यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्षामध्ये जाहीर प्रवेश युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे…
राज्यातले रखडलेले प्रश्न न्यायालयापर्यंत नेऊन शासन दरबारी त्याची अंमलबजावणी करण्यास सरकारला भाग पाडणारे कायदे तज्ञ वकील ॲड विकास बा पाटील शिरगावकर यांना राज्यसभा अथवा विधान परिषदेवरती सरकार का घेत नाही? विचारवंतांची सरकारला गरज नाही का? रिटायर्ड जज लेखक विचारवंतांचा सरकारला सवाल.
September 11, 2026
राज्यातले रखडलेले प्रश्न न्यायालयापर्यंत नेऊन शासन दरबारी त्याची अंमलबजावणी करण्यास सरकारला भाग पाडणारे कायदे तज्ञ वकील ॲड विकास बा पाटील…
