पाचगणीच्या मा: नगराध्यक्ष नगरसेवक लक्ष्मी कराडकर व सहकाऱ्यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना गरजू साहित्य वाटप.!

पाचगणीच्या मा: नगराध्यक्ष नगरसेवक लक्ष्मी कराडकर व सहकाऱ्यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना गरजू साहित्य वाटप.!

August 16, 2026 | महाबळेश्वर

प्रतिनिधी पांचगणी

पाचगणीच्या मा: नगराध्यक्ष नगरसेवक लक्ष्मी कराडकर व सहकाऱ्यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना गरजू साहित्य वाटप साहित्य वाटपानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाचा उत्सव.

पाचगणी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष नगरसेवक लक्ष्मी कराडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून पाचगणी नगरपरिषद मुला मुलींच्या शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले, यावेळी लक्ष्मी कराडकर म्हणाल्या सालाबाद प्रमाणे आम्ही सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले आहे, आज मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता खूप आनंद होत आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही पाचगणी हे शिक्षणाचे माहेरघर आहे, ज्या कार्यकाळामध्ये आमच्या हातात या शहराची सत्ता होती त्यावेळेस विद्यार्थी शिकत असणाऱ्या या शाळेचा कायापालट केला गेला होता परंतु आजच्या या विस्कटलेल्या भिंती पाहून दुःख होतं आशा करूया लवकरात लवकर पाचगणी नगर परिषदेच्या माध्यमातून विकास निदान या विद्यार्थ्यांच्या पर्यंत तरी पोहोचेल आणि विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे क्लासरूम पाचगणी नगर परिषदेचे मार्फत उपलब्ध करून मिळतील यासाठी इथून पुढे प्रयत्न करणार असल्याचे पाचगणी नगरीच्या माजी नगराध्यक्ष नगरसेवक लक्ष्मी कराडकर यांनी सांगितले यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांसह अनेक नगरसेवक उपस्थित होते.

Categories: महाबळेश्वर

Related Posts

सातारा जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या ढसाळ कारभाराच्या विरोधात पीपल्स रिपब्लिकन पक्षांने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी मुंबई येथील चित्रकूट बंगल्या बाहेर पुकारलेले आंदोलन स्थगित करा पुढील आठवड्यात बैठक घेऊन दोशींवरती कडक कारवाई करू महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची राज्यमंत्री जयदीप कवाडे यांच्याकडे मागणी बैठकीवेळी युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे सह अन्य कार्यकर्ते उपस्थित.

August 13, 2026

सातारा जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या ढसाळ कारभाराच्या विरोधात पीपल्स रिपब्लिकन पक्षांने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी मुंबई येथील…