बिनशेती परवान्याचे उल्लंघन  करून बांधलेल्या मॅप्रो हेरिटेज पार्कला आर्थिक सलोखा राखून राजाश्रय देणारे साताराचे उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यावर कारवाई करा कारवाई न झाल्यास महसूलमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करू प्रणित मोरे यांचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन.!

बिनशेती परवान्याचे उल्लंघन करून बांधलेल्या मॅप्रो हेरिटेज पार्कला आर्थिक सलोखा राखून राजाश्रय देणारे साताराचे उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यावर कारवाई करा कारवाई न झाल्यास महसूलमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करू प्रणित मोरे यांचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन.!

July 13, 2026 | सातारा

प्रतिनिधी सातारा

बिनशेती परवान्याचे उल्लंघन करून बांधलेल्या मॅप्रो हेरिटेज पार्कला आर्थिक सलोखा राखून राजाश्रय देणारे साताराचे उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यावर कारवाई करा कारवाई न झाल्यास महसूलमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करू प्रणित मोरे यांचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन.

मौजे भोसे येथील गट नंबर 41/5, मौजे भोसे, ता: महाबळेश्वर येथे मॅप्रो हेरिटेज पार्क नावाचे व्यावसायिक फूड पार्क हॉटेल सुरू झाले आहे. सदर बांधकामासाठी व बिनशेती परवानगी साठी सद्य ठिकाणी शेतीपूरक व्यवसाय करण्यात यावा या अटीवर जिल्हाधिकारी सातारा यांनी परवानगी दिली आहे, परंतु सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारचा शेतीपूरक व्यवसाय नगरचे दिसून आले असून या संदर्भात मा: जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना पत्र देऊन वारंवार भेटून सुद्धा संबंधित विषयाची दिशाभूल ते करत आहेत. बिनशेती परवाना संबंधित कार्यालयामार्फत दिला गेल्याने त्यावर कारवाई करायचे अधिकार देखील त्यांनाच आहेत हे माहीत असून सुद्धा स्वतःचे हितसंबंध जोपासण्यासाठी नागेश पाटील मुद्दामून उपविभागीय अधिकारी वाई व तहसीलदार यांना अहवाल सादर करा ,अशी दिशाभूल करणारी पत्र देत आहेत. संबंधित विषयावर कारवाई करण्याची त्यांची कोणत्याही प्रकारचे इच्छा नाही. इको सेन्सेटिव्ह झोन मध्ये या प्रकारे राजरोसपणे बिनशेती नियमांचे उल्लंघन करून बांधकाम होत असतील व त्याला स्वतः उपजिल्हाधिकारी नागेश पाटील खतपाणी घालत असतील तर हे महाबळेश्वरच्या पर्यावरणासाठी व इको सेन्सिटिव्ह झोनच्या नियमांसाठी घातक आहे. त्यामुळे संबंधित विषयाची तात्काळ दखल घेऊन मॅप्रो हेरिटेज पार्क सील करण्यात यावे व त्याला अभय देणारे उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार ,आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर, तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ,राज्यमंत्री जयदीप भाई कवाडे यांच्या दिशा निर्देशानुसार आक्रमक आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल असे पत्र अप्पर जिल्हाधिकारी सातारा यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टी मार्फत देण्यात आले. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे, सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे ,वाई तालुका अध्यक्ष विजय सातपुते, अमोल चव्हाण, ऋषभ सपकाळ सचिन अंबिके आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Categories: सातारा

Related Posts

सातारा उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची जिल्ह्यातून तात्काळ हकलपट्टी करा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांची निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे मागणी.!

July 13, 2026

प्रतिनिधी सातारा सातारा उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची जिल्ह्यातून तात्काळ हकलपट्टी करा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांची निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी…