राम कृष्ण हरी च्या गजरात कासवंड गावची चैतन्य कचरनाथ स्वामी पायीवारी श्री क्षेत्र चोरमले वाडी ते पंढरपूर पालखी पंढरपूर कडे मार्गस्थ शिवराज उद्योग समूह च्या तर्फे श्री निलेश गोकुळ गोळे यांच्याकडून वारकऱ्यांशी संवाद पाणी बॉटल सह अल्पोहर वाटप.
July 12, 2026 | महाबळेश्वर, महाराष्ट्र
प्रतिनिधी पांचगणी
राम कृष्ण हरी च्या गजरात कासवंड गावची चैतन्य कचरनाथ स्वामी पायीवारी श्री क्षेत्र चोरमले वाडी ते पंढरपूर पालखी पंढरपूर कडे मार्गस्थ शिवराज उद्योग समूह च्या तर्फे श्री निलेश गोकुळ गोळे यांच्याकडून वारकऱ्यांशी संवाद पाणी बॉटल सह अल्पोहर वाटप.
राम कृष्ण हरी च्या गजरात कासवंड गावची दिंडी ही भाविकांना ओढ लागलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाकडे आज रोजी मार्गस्थ झाली असून या दिंडीला कासवंड गावचे भूमिपुत्र व स्वतः ह भ प श्री निलेश गोकुळ गोळे यांनी वारकऱ्यांशी थेट संवाद साधत वारकऱ्यांना पाणी बॉटल सह खाऊ वाटप करत राम कृष्ण हरी च्या गजरात दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ श्री चैतन्य कचरनाथ स्वामी पालखी सोहळ्यात सहभाग घेतला यावेळी मोठ्या प्रमाणात वारकरी पायी वारीत मार्गस्थ असून वारकऱ्यांनी निलेश गोळे यांना श्रीफळ देत त्यांच्या कार्याचा गौरव केला तसेच माऊलीच्या गजरात दिंडी पंढरपूर कडे मार्गस्थ झाली. श्री निलेश गोळे म्हणाले मी स्वतः माळकरी असून पंढरपूर च्या विठ्ठलाचा एक सच्चा भक्त आहे, आणि यावेळी मी विठ्ठलाकडे प्रार्थना करतो की भरपूर पाऊस या राज्यात पडू दे आणि या राज्याचा शेतकरी सुजलाम सुफलाम होऊ दे , प्रत्येक वारकरी माळकरी समृद्ध होऊदे तुझ्या नामाचा जयघोष अखंड होऊ दे, तुझी कृपा अपार आहे.व यानंतर दिंडी ही पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.
Categories: महाबळेश्वर, महाराष्ट्र
Related Posts
महाबळेश्वर तालुक्यात सर्पमित्र अक्षय गायकवाड कडून हजारो सापांना आतापर्यंत मिळाले जीवनदान वनविभागाने सर्पमित्रांकरिता व्यासपीठ उभारण्याची गरज.!
July 11, 2026
प्रतिनिधी पांचगणी महाबळेश्वर तालुक्यात सर्पमित्र अक्षय गायकवाड कडून हजारो सापांना आतापर्यंत मिळाले जीवनदान वनविभागाने सर्पमित्रांकरिता व्यासपीठ उभारण्याची गरज महाबळेश्वर तालुक्याला…
सातारा उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची जिल्ह्यातून तात्काळ हकलपट्टी करा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांची निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे मागणी.!
July 13, 2026
प्रतिनिधी सातारा सातारा उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची जिल्ह्यातून तात्काळ हकलपट्टी करा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनमोल कांबळे यांची निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी…
