अखेर मौजे कासवंड हिरवेवाडी ला प्रथमच मा.श्री निलेश गोकुळ गोळे यांच्या प्रयत्नातून अनेक वर्ष रखडलेला सुसज्ज दर्जेदार रस्ता मिळाला.सर्व नागरिकांकडून कौतुक आणि आभार व्यक्त.!



प्रतिनिधी भिलार 

अखेर मौजे कासवंड हिरवेवाडी ला प्रथमच मा.श्री निलेश गोकुळ गोळे यांच्या प्रयत्नातून अनेक वर्ष रखडलेला सुसज्ज दर्जेदार रस्ता मिळाला.सर्व नागरिकांकडून कौतुक आणि आभार व्यक्त.

श्री क्षेत्र मौजे कासवंड या गावाला जोडणारा रस्ता हा हिरवेवाडी इथून पुढे जातो या वॉर्ड चे ग्रामपंचायत सदस्य हे श्री निलेश गोकुळ गोळे असून हिरवेवाडीच्या विकासासाठी ते कायमच पुढे राहिले आहेत 2020 साली ग्रामपंचायत सदस्य होत असताना स्वतःच्या मालकीची जागा ग्रामपंचायत कासवंड ला हस्तांतरित केली लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटावा आणि सुसज्ज सभामंडप उभारण्यात यावे या करिता राजकारण कुरघोडी काड्याकरणे या सगळ्याशी कधीही दुरान्वय संबंध आजही नाही उच्चशिक्षित चारित्र्यवान व्यावसायिक व्यक्तिमत्व फक्त लोकांचं चांगल झालं पाहिजे आपल्या हातून चांगलं च करता याव लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा तरी परिपूर्ण असाव्यात इतकचं निलेश गोळे यांचं ध्येय आणि त्यास कटिबद्ध राहूनच गेली सहा वर्षे सातत्याने हिरवेवाडीच्या विकासासाठी कोणताही गाजावाजा न करता प्रयत्न करीत आहेत आणि आज हिरवेवाडीचा कायापालट झालेला दिसत आहे. रस्ता होत असताना पावसाळी पाण्याचे काय म्हणून स्वतः निलेश गोळे आनंद डोचके प्रताप भिलारे गणेश गोळे यांनी स्वखर्चातून तात्काळ सिमेंटचे भले मोठे पाईप टाकून घेतले जेणे करून रस्त्याला धोका निमार्ण होऊ नये म्हणून शिवाय स्थानिक रहिवासी यांचा देखील रस्त्यकरिता मागील सहा दिवसांपासून दररोज स्वतः ग्रामस्थ उभे राहून काम व्यवस्थित करून घेत आहेत . याचे विशेष कौतुक आहे. हा रस्ता होणे अत्यंत आवश्यक होते ह्या पूर्वी आम्ही स्वतः30 ते 35 वर्षापूर्वी दगड माती गोळा करून स्वतः वाहतूक करत आम्ही खोदून हा रस्ता तयार केला होता त्यांनतर ग्रामपंचायत माध्यमातून डांबरीकरण झाले पण पावसाचे प्रमाण पाहता रस्ता दरवर्षी खराब होत असे परंतु आता हा रस्ता चांगला झाला आहे आणि आजही स्वतः उभे राहून रस्ता करून घेतला समाधान वाटते

स्थानिक ग्रामस्थ.. श्री आनंदा डोचके ..प्रगतशील स्ट्रॉबेरी उत्पादक. हॉटेल व्यावसायिक पूर्वीचे कासवंड हिरवेवाडी आणि आता यामध्ये फार मोठे परिवर्तन झाले आहे आज ग्रामस्थ हॉटेल व्यवसायाकडे वळले आहेत त्यामुळे पर्यटक वाढत आहेत लोकांना रोजगार मिळत आहे या पार्श्वभूमीवर चांगला रस्ता अत्यंत आवश्यक होता व आज तो झाला.

ग्रामस्थ … श्री प्रताप भिलारे .. स्ट्रॉबेरी उत्पादक.हॉटेल व्यावसायिक प्रगतशील शेतकरी.लहान पणापासून रस्त्यांची दुरावस्था पाहत आहे आज प्रथम रस्ता चांगला झाला शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरी संकलन करत असताना रस्त्याचा वाहतुकीला प्रचंड अडथळा होत होता

ग्रामस्थ ..श्री संजय हिरवे..व्यापारी..

हा रस्ता आणि मौजे कासवंड हिरवेवाडी सह संपूर्ण कासवंड गावात आणि गावातील एकूण सर्व वाड्यांमध्ये रस्ते संरक्षण भिंती ही कामे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा स्थानिक आमदार मा. नामदार श्री मकरंद आबा पाटील यांच्या आपत्ती व्यवस्थापन या खात्याच्या अंतर्गत लँड स्लाईड प्रणव क्षेत्रामधुन कामे सुरू आहेत याचे आम्हाला समाधान आहे आणि महाबळेश्वर तालुक्याचे सहकार रत्न श्री राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या विशेष प्रयत्न आणि सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते त्यांचेही आभार तसेच ग्रामपंचायत कासवंड. ग्रामस्थ कासवंड. ग्रामसेवक श्री रविकांत सपकाळ बांधकाम विभागाचे अभियंता श्री गवळी. ठेकेदार गणेश राजपुरे सर्व टीम यांचे ही हिरवेवाडी ग्रामस्थांनच्या वतीने आभार.

श्री निलेश गोकुळ गोळे. ग्रामपंचायत सदस्य तथा उद्योजक कासवंड.