बक्षीची बक्षीस गीरी मौजे कासवंड येथील शनिवार रविवारचे अवचित्य साधून मुख्य गावठाणात बाबा ऍग्रो हॉलिडे होम मध्ये नक्की काय सुरू आहे ? छम छम की छन छन पाचगणी पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष.!



प्रतिनिधी पांचगणी 

बक्षीची बक्षीस गीरी मौजे कासवंड येथील शनिवार रविवारचे अवचित्य साधून मुख्य गावठाणात बाबा ऍग्रो हॉलिडे होम मध्ये नक्की काय सुरू आहे ? छम छम की छन छन पाचगणी पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष.!

मौजे कासवंड येथील गेल्या वर्षभरापूर्वी पाचगणी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी अचानक रित्या धाड टाकून छम छम पार्टीत गुंग असणाऱ्या महिलांसह पुरुषांना रंगेहात अटक केली होती व या अटकेनंतर अनेक वृत्तपत्रांमध्ये कासवंड येथील बेकायदेशीर हॉटेलचा मुद्दा अहिरणी वरती आला होता त्याच प्रकारे आज रोजी देखील कासवंड येथील बाबा ऍग्रो हॉलिडे होम या मुख्य गावठाणा मध्ये सुरू असणाऱ्या हॉटेलमध्ये असेच प्रकार सुरू आहेत का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे बाबा ऍग्रो हॉलिडे होम ने google वरती ऑनलाइन आपल्या हॉटेलची ऍड करत शनिवार रविवारचे अवचित्य साधून कॉलेजच्या युवक युवतींना आकर्षित केले असल्याचे ऑनलाईन google वरती दिसून येत आहे व हॉटेल परिसरात देखील युवतींची रहदारी वाढली असल्याचे दिसून येत असल्याने यामुळे युवा पिढी बरबादीच्या वाटेवरती येत आहे व छम छम सह अन्य पार्टी या हॉटेलमध्ये सुरू आहेत का? मुख्य गावठाणात सुरू असणाऱ्या या हॉटेलमुळे हा प्रश्न उपस्थित झाला असून पाचगणी पोलिसांन सह इतर शासकीय विभागांनी जर का मुख्य गावठाणात हॉटेल चालवण्याकरिता या बाबा ऍग्रो हॉलिडे होम नावाच्या हॉटेलला परवानगी दिली नसल्यास कासवंड येथील मुख्य गावठाणा मध्ये बाबा ऍग्रो हॉलिडे होम हे हॉटेल कसं काय सुरू आहे ? व याला कुणाचे अभय आहे, हा देखील प्रश्न उपस्थित झाला असून पाचगणी पोलीस प्रशासन यावरती कारवाई करणार का? हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे इतकच नाही तर या बाबा ऍग्रो हॉलिडे होम बक्षी नावाच्या इसमाचे अभय असल्याचे दिसून येत आहे या व्यक्तीने कासवंड येथील एका जागेवरती आयुर्वेदिक दवाखाना खोलत आहे असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांकडून शासनाकडून परवानगी मिळवली व त्या जागेवरती आयाती नावाचे एक भले मोठे नियमबाह्य हॉटेल उभे केले गेले असल्याचे दिसून येत आहे दवाखान्याच्या नावावरती करोडो रुपयांची बँकांची देखील दिशाभूल केल्याचे दिसून आले आहे परंतु वास्तविकरित्या पाहता बँकांनी ज्या दवाखान्याकरिता पैसे दिले तो दवाखाना त्या जागेवरती उभा राहिलाच गेला नाही त्या जागेवरती आलिशान हॉटेल उभे केले गेले आहे याच हॉटेलमध्ये राहणाऱ्या युवक युवतींना रात्रीच्या अंधारात कासवंड येथील मुख्य गावठाणात बाबा ऍग्रो हॉलिडे होम या मध्ये पाठवले जात असल्याची माहिती समोर येत असून पोलीस प्रशासनाने या मध्ये लक्ष घालून योग्यरीत्या तपास करणे गरजेचे आहे., जर का पोलीस प्रशासनाने व इतर प्रशासनाने या बाबा ऍग्रो हॉलिडे होम परवानगी दिली नसल्यास तात्काळ पोलीस प्रशासन हॉटेल सील करणार का? गावठाणात बेकायदेशीररीत्या हॉटेल चालवणाऱ्या गणपत पवार व त्याचा मुलगा या जागे मलकांवरती पाचगणी पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करणार का? युवक युवतींना या बाबा ऍग्रो हॉलिडे होम मध्ये येण्यास बंदी घालणार का ? हे बघणे गांभीर्याचे ठरणार आहे